Sunday, May 19, 2024
Homeक्रीडातीन आयर्नमॅन नाशकात दाखल; गरवारे पाॅइंटवर जंगी स्वागत

तीन आयर्नमॅन नाशकात दाखल; गरवारे पाॅइंटवर जंगी स्वागत

नाशिक | प्रतिनिधी 

अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी ‘आयर्न मॅन’ स्पर्धा नाशिकच्या चौघांनी  पूर्ण करत सातासामुद्रापार तिरंगा फडकवला. यापैंकी आज तीन नाशिककरांचे आज शहरात आगमन झाले. नाशिककरांनी शहराच्या वेशीवर आलेल्या तिघा ‘आयर्न मॅन’चे जंगी स्वागत केले. शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील गरवारे पाॅइंटवर हा सोहळा पार पडला. यावेळी डॉ. मनीषा रौंदळ यांनी औक्षण केले.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाच्या बसल्टन येथे पार पडलेल्या स्पर्धेत नाशिकच्या चार खेळाडूंनी अतिशय खडतर समजली जाणारी ‘आयर्न मॅन’ स्पर्धा आव्हानात्मक वातावरणात पूर्ण केली.

नाशिक सायकलीस्टचे सदस्य किशोर घुमरे, प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले असे चौघा खेळाडूंचे नावे आहेत. यातील किशोर घुमरे वगळता इतर तिघेजण आज नाशिकमध्ये दाखल झाले.

यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी खास नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, नाशिक सायकलीस्ट असोशिएशनचे पदाधिकारी, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

स्पर्धेदरम्यान थंड पाण्यात जलतरण, प्रतिरोध करणाऱ्या वाऱ्याचा सामना सायकलिंग आणि रनिंग करावी त्यांना करावी लागली. डॉ. गचाले यांनी शेवटच्या क्षणी अतिशय वेगाने धावून ही स्पर्धा चार मिनिट आधी पूर्ण करत बाजी मारल्याने त्यांचा अनुभव ऐकण्यासाठी अनेकांनी त्यांच्याजवळ गर्दी केली होती.

किशोर घुमरे यांचे मायदेशी ९ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. प्रशांत डबरी व  महेंद्र छोरीया यांनी मागील वर्षी कोल्हापूर येथे हाफ आयर्न मॅन स्पर्धा यशस्वी पूर्ण केली होती.

तसेच डॉक्टर अरुण गचाले यांनी गोवा येथे हाफ आयर्न मॅन स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात पूर्ण केली होती. याआधी नाशिकचे माजी पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनीही या स्पर्धेत आपले नाव कोरले होते. या स्पर्धेत विजयश्री प्राप्त करणाऱ्या तिघांना  डॉ. पिंपरीकर यांच्या स्पोर्टमेड रीहाब सेंटरचे डॉ. मुस्तफा टोपीवाला यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेचे स्वरूप

या स्पर्धेत 3.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग,  42 किलोमीटर रनिंग असे असून या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 17 तासांचा अवधी  तास दिले जातात.

- Advertisment -

ताज्या बातम्या