नविन नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरातील नवीन नाशिक व नाशिक पूर्व भागात येत्या शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. नाशिक महापालिके च्या मुकणे रॉ बॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये महावितरण कंपनीमार्फत शनिवार (दि.१४) रोजी विविध पावसाळापूर्व दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत. यासाठी महावितरण कंपनीकडून शनिवार सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे मनपाचे मुकणे रों वॉटर पंपिंग स्टेशन येथून विल्होळी जलशुध्दीकरण केंद्राला होणारा पाणीपुरवठा शक्य होणार नाही. म्हणून शनिवार सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून नाशिक शहरातील नवीन नाशिक व नाशिक पूर्व भागास पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





