Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Dam Storage : जिल्ह्यातील धरणे भरली; कोणत्या धरणांत किती टक्के पाणीसाठा?

Nashik Dam Storage : जिल्ह्यातील धरणे भरली; कोणत्या धरणांत किती टक्के पाणीसाठा?

या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु

नाशिक | Nashik

गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करुन टाकले असून नद्या, नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. दुसरीकडे या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जिल्ह्यातील काही धरणे शंभर टक्क्यांपर्यंत भरली आहेत.यामध्ये गंगापूर धरण (Gangapur Dam) ८९.८४ इतके टक्के भरले असून या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील १८ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain Update : नाशकात पावसाची संततधार, तर त्र्यंबकला ‘जोर’धार; नागरिकांचे हाल

जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी व इगतपुरी या तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी अद्याप कायम आहे. तर भोजापुर, आळंदी,वाघाड, ओझरखेड, भावली, वालदेवी, हरणबारी, केळझर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.तसेच घाटमाथ्यावरील भागात रविवारी सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ३६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.तर जिल्ह्यात सरासरी ८७ टक्के पाऊस (Rain) झाला असून धरणांसाठी ८१.१० टक्के इतका झाला आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain Update : पालकमंत्री भुसेंनी गोदाघाटावर जाऊन घेतला पाणी पातळीचा आढावा

कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा

गंगापूर धरण ८९.८४ टक्के, गौतमी गोदावरी ९४.८६ टक्के,कश्यपी धरण ८२.६७ टक्के, पालखेड धरण ७७.३४ टक्के, करंजवण धरण ९७ टक्के, पुणेगाव धरण ८६.०४ टक्के,दारणा धरण ९३.७५ टक्के, मुकणे धरण ७४.२६ टक्के, कडवा धरण ८६.०२ टक्के, नांदूरमध्यमेश्वर धरण ८१.७१ टक्के, चणकापूर धरण ८७.५२ टक्के, गिरणा धरण ६० टक्के, पुनद धरण ७५ .११ टक्के, माणिकपुंज ९०.१५ टक्के तर आळंदी, वाघाड, ओझरखेड,तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापुर, हरणबारी, केळझर ही धरणे १०० टक्के भरली आहेत.

हे देखील वाचा : Nashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची ‘जोर’धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर

या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु

जिल्ह्यातील अनेक धरणे तुडूंब भरली असल्याने अतिरिक्त पाणी सोडावे लागत आहे. मुसळधार पावसामुळे धरणांमधील वाढती आवक लक्षात घेऊन त्या अनुषंगाने पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. गंगापूरमधून सोडलेले पाणी आणि शहर परिसरात सुरू असलेली संततधार यामुळे गोदावरी पूर येण्याच्या स्थिती कायम आहे. आज गंगापूरमधून ८ हजार ४२८ क्युसेक, दारणातुन १२ हजार १७८, भावली ७०१, भाम २ हजार ९९०, गौतमी गोदावरी २ हजार ५६०, वालदेवी १८३, आळंदी २४३, नांदूरमध्यमेश्वर ६३ हजार ३७१, भोजापूर १ हजार ५२४, पालखेड २० हजार ८९०, हरणबारी प्रकल्पातून ७ हजार ६४३ आणि केळझर प्रकल्पातून २ हजार ७१६, चणकापुरमधून १६ हजार २६८, कडवा ३ हजार ११०, तिसगाव ८०४, ओझरखेड ४ हजार ९५२, पुणेगाव ५ हजार, करंजवण ९ हजार ९०८ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तर गंगापूर, दारणा आणि पालखेड समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे पुढे मराठवाड्याकडे मार्गस्थ होते.

हे देखील वाचा : काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

जायकवाडीला २८ टीएमसी पाणी रवाना

नाशिक आणि नगरच्या धरणांमधून एकूण २८ टीएमसी इतके पाणी ०१ जूनपासून पैठणच्या जलाशयात पोहोचल्याने या धरणामध्ये ३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यात नाशिकमधून २० तर नगरमधून ०८ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. तर गंगापूर आणि दारणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने दोन्ही धरणांच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली, त्याचा फायदा जायकवाडीला झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वत्र नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. तसेच यंदा वेळेवऱ चांगला पाऊस झाला असून पिंकांना फायदा झाला आहे. तर विहीरी देखील तुडूंब भरल्या आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या