Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : नवीन नाशिकच्या रखडलेल्या प्रकल्पांचे काय?

Nashik News : नवीन नाशिकच्या रखडलेल्या प्रकल्पांचे काय?

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

नवीन नाशिक परिसरातील (New Nashik Area) सर्वात मोठ्या दोन प्रकल्पांचे (Projects) काम कित्येक वर्षांपासून रखडले होते. त्यातील छत्रपती शिवाजी महाराज सेंट्रल पार्कसाठी आ. सीमा हिरे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून लवकरच या कामाची सुरुवात होणार असून त्यासोबतच सुरू असलेल्या राजे संभाजी स्टेडियमच्या कामाचीदेखील वर्कऑर्डर निघून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने लवकरच हे दोनही प्रकल्प नवीन नाशिककरांसाठी खुले होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

नवीन नाशकातील सर्वात मोठ्या खदानींवर सुमारे ४३८ गुंठे जागेत वसलेले राजे संभाजी स्टेडियम (Sambhaji Stadium) विस्तारीकरणासाठी २० वर्षांनंतर मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला होता. मात्र अनेक अडचणींमुळे रखडलेले संभाजी स्टेडियमचे काम सुरू झाले. मात्र अद्यापही ते पूर्णत्वास न आल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. सुमारे २२ ते २५ वर्षांपूर्वी शहरातील घंटागाडी ठेकेदार सध्याच्या राजे संभाजी स्टेडियमच्या जागी असलेल्या खदानीत शहरातील कचरा टाकत असे. त्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असायचे. येथील बऱ्याच रहिवाशांनी तर आपली राहती घरे, बंगलो मिळेल त्या भावात विक्री केली होती.

अशा परिस्थितीत त्यावेळचे नगरसेवक मामा ठाकरे यांनी मनपा प्रशासनाकडून संबंधित खदान बुजवून त्या ठिकाणी क्रीडा संकुल उभे करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.या कामासाठी सुमारे २.५ कोटी रुपयांचा निधी मनपाने मंजूर केला होता. १९९८-९९ मध्ये तत्कालीन महापौर अशोक दिवे यांच्या हस्ते या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. पडित खदानीला भव्य असे राजे संभाजी स्टेडियम असे नामकरण करण्यात आले. नवीन नाशिक परिसरातील एकमेव मोठे असे इनडोअर व आऊटडोअर स्टेडियम म्हणून या स्टेडियमची ओळख झाली.

राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारासाठी तब्बल २० वर्षांनंतर ‘खेलो इंडिया खेलो’ योजनेअंतर्गत राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारकडून सहा कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र येथे काम करत असलेल्या ठेकेदाराला आलेल्या वैयक्तिक अडचणीमुळे येथील काम बंद पडले होते. त्यानंतर या प्रभागाच्या माजी नगरसेविका किरण दराडे व त्यांचे पती बाळा दराडे यांनी हे काम सुरू करण्याकरता संभाजी स्टेडियम येथेच वारंवार उपोषण केल्याने येथील काम सुरू झाले होते. मात्र त्यानंतरही या ठिकाणी दुर्लक्ष झाले होते. मात्र आता काही दिवसापूर्वी सदर कामाचा ठेका नवीन ठेकेदाराला देण्यात आला. येथील कामाची सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले, मात्र आता तरी येथील काम लवकरात लवकर पूर्ण होऊन स्टेडियमचा वापर करता येईल, अशी आशा नवीन नाशिककरांनी व्यक्त केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...