Thursday, May 2, 2024
Homeनाशिकविहिरीत पाय घसरून पडल्याने महिलेचा मृत्यू; देवळा तालुक्यातील घटना

विहिरीत पाय घसरून पडल्याने महिलेचा मृत्यू; देवळा तालुक्यातील घटना

खामखेडा | वार्ताहर

देवळा तालुक्यातील भिलवाड येथे ३२ वर्षीय महिलेचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे…

- Advertisement -

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भिलवाड (ता.देवळा) येथील शिवारात सायंकाळच्या सुमारास रोहिणी बळीराम जाधव (वय ३२) ही महिला विहिरीतून पाणी काढत असतांना पाय घसरून पडल्याने तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

विहिरीला पाणी जास्त असल्याने या महिलेचा मृतदेह शोधण्यासाठी विहिरीतील संपूर्ण पाण्याचा उपसा करण्यात आला. २४ तासांनी या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे भिलवाड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महिलेच्या पश्चात पती , एक मुलगा , सासू ,सासरे असा परिवार आहे . देवळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एल. के.धोक्रट करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या