Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News : दमणगंगेच्या पुराने घेतला तरूणाचा बळी

Nashik News : दमणगंगेच्या पुराने घेतला तरूणाचा बळी

पेठ | वार्ताहर | Peth

गत सप्ताहापासून पडत असलेल्या पावसाने (Rain) पेठ तालुक्यातील (Peth Taluka) नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, यामध्येच तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील धानपाडा (Dhanpada) येथील गणपत गंगा कोदी (वय ४३) हा युवक (Youth) शेतकरी शेतीची कामे आटोपून सायंकाळी ७. ३० वाजता घराकडे परत येत असतांना दमण गंगेच्या (Daman Ganga) तीव्र प्रवाहात दोन दिवसापूर्वी वाहून गेला होता.

YouTube video player

त्यानंतर ही बाब नातेवाईक यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रात्रभर शोध कार्य केले. मात्र, रात्रीचा अंधार व पाण्याच्या प्रवाहाने शोध कामात मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. तेव्हापासून नातेवाईक (Relatives) व ग्रामस्थांकडून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, यानंतर आज (गुरुवार) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास गणपत कोदी याचा मृतदेह (Dead Body) खामशेत जवळील निसदा या जागी आढळून आला. याबाबत तलाठी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...