Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPolitical News : जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये शक्य; आठ ऑक्टोबरला प्रारूप मतदार...

Political News : जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये शक्य; आठ ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या (Zilla Parishad and Panchayat Samiti) सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मतदार यादीचा (Voter List) कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा परिषद, महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (Local Body Election) राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ रोजीपर्यंतच्या मतदार यादी नोंदणीचा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.

YouTube video player

मतदार यादीच्या आता जाहीर कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल.

राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक (Election) होईल. २७ ऑक्टोबरला गणनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आयोग जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल. आठवड्यात नगरपरिषदांसाठी तर शेवटच्या आठवड्यात महापालिकांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या ईव्हीएम मशिन्सची कमतरता आहे.

सध्या ६५ हजार मशिन्स उपलब्ध आहेत. निवडणुकीपूर्वी आणखी २० हजार मशिन्स खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यासाठी आयोगाला सुमारे पावणेदोन लाख मशिन्स लागणार आहेत. त्यासाठी साधारणपणे एक लाख मशिन्स मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगाकडून भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने या आयोगासोबत करारसुद्धा केला आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...