Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक मनपा 2020 स्वच्छ सर्व्हेक्षण : थ्री स्टार रेटींग वरुन नाशिकची वन...

नाशिक मनपा 2020 स्वच्छ सर्व्हेक्षण : थ्री स्टार रेटींग वरुन नाशिकची वन स्टार वर घसरण

नाशिक ।  प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने नुकतेच स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 अंतर्गत देशातील कचरा मुक्त शहराची सात तारांकीत रेटींग जाहीर केली असुन यात पाच तारांकीत रेटींग नवी मुंबई, इंदौर, म्हैसुर, सुरत, राजकोट व अंबिकापूर या शहरांना मिळाले आहे. यात तीन तारांकीत रेटींग असलेल्या नाशिकची मोठी घसरण होऊन नाशिक महापालिका ही एक तारांकीत रेटींगच्या यादीत जाऊन पोहचली असुन 3 तारांकीत शहरात धुळे जळगांव यांच्यासह देशातील 65 आली आहे. नाशिक महापालिकेच्या घसरणीमुळे प्रशासनाला मोठा धक्का बसला असुन आरोग्य विभागाकडुन आता कारणमिमांशा सुरु झाली आहे.

- Advertisement -

केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडुन हरदिप सिंग पुरी यांनी कचरा मुक्त शहराचे तारांकीत रेटींग नुकतेच जाहीर केले आहे. या यापुर्वी स्वच्छ शहरात स्वच्छ सर्व्हेक्षणात आलेल्या इंदौर, म्हैसुर, सुरत, राजकोट यांचा पुन्हा समावेश झाला असुन या शहरांना फाईव्ह स्टार रेटींग मिळाले आहे. तर दुसर्‍या क्रमांकाचे मानले गेलेले थ्री स्टार रेटींग देशातील 65 शहरांना मिळाले असुन यात उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगांव, शिर्डी यांचा समावेश आहे. मागील वर्षात नाशिक थ्री स्टार रेटींग मध्ये असतांना आता नाशिकचा नंबर वन स्टार रेटींगवर घसरला आहे. यावरुन नाशिक महापालिकेची स्वच्छतेसंदर्भातील कामगिरी चांगली नसल्याचे समोर आले आहे.

केंद्र शासनाच्याकडुन दरवर्षी राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणांत 2020 च्या सर्व्हेक्षण नुकतेच जानेवारी महिन्यात पुर्ण झाले होते. देशांतील पहिला दहा शहरात येण्यासाठी महापालिकेची सुरु असलेली धडपड यंदा बिनकामाची ठरली आहे. महापालिका आरोग्य विभागाकडुन शहराची स्वच्छतेची अवस्था इतर वेळेस कशी असते आणि सर्व्हेक्षण वेळेत व्यवस्था यासंदर्भातील स्थिती माजी महापौर रंजना भानसी यांनी मागील वर्षात गोदाकाठा लगत केलेल्या पाहणी दौर्‍यातून समोर आली होती.

यानंतर शहरात दोन वर्षापुर्वी स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या निमित्ताने बाजारपेठेत लावण्यात आलेल्या डस्टबीनमधील भ्रष्टाचार शिवसेेनेने समोर आणला होता. शहरातील अपुर्ण सफाई कामगार आणि उपलब्ध कामगारांकडुन प्रभावी काम करुन घेतले जात नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. याच कारणावरुन स्वच्छतेसंदर्भात नागरिकांचा फिडबँक चांगल्या प्रकारे मिळत नसल्याचे आत्तापर्यत समोर आले असुन यामुळेच पहिल्या दहा मध्ये येण्याचे स्वप्न अद्याप पुर्ण झालेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या