Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक शहरात करोना मृत्यू ४ हजार, अनुदानासाठी अर्ज आले ८ हजार ७००;...

नाशिक शहरात करोना मृत्यू ४ हजार, अनुदानासाठी अर्ज आले ८ हजार ७००; काय असेल प्रकार?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात (Nashik City) व परिसरात करोनामुळे (Corona) निधन पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान (subsidy) मिळणार आहे. यासाठी मनपाकडे ८ हजार ७०० अर्ज आले आहेत. परंतु शासकीय आकडेवारीनुसार, नाशिक शहरात करोना मृतांची संख्या ४ हजार ३० आहे. म्हणजेच नाशिक शहरात करोना मृतांची आकडेवारी लपवण्यात आली आहे किंवा अनेकांनी करोनामुळे मृत्यू नसतांना मदतीसाठी अर्ज दाखल केले आहेत….

- Advertisement -

नाशिककरांनो काळजी घ्या! अकरा दिवसांत साडेचारशेवरून रुग्णसंख्या पोहोचली साडेसहा हजारावर

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून (NMC) ४ हजार ३० रुग्णाचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाल्याचा शासकीय अहवालात म्हटले आहे. परंतु करोनाने मृत्यू झालेल्या नातेवाईकांकडून आतापर्यंत आठ हजार अर्ज (Application) दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी जवळपास 1702 अर्जांची छाननी करून त्यांना मनपा आरोग्य वैद्यकीय विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.

अर्ज जास्त मृत्यू कमी काय आहे प्रकार?

करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या कमी असतांना अर्ज जास्त आले आहेत, यासंदर्भात वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केली जात आहे. काय असतील शक्यता जाणून घेऊ या…

  • शासकीय अहवालात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवण्यात आली आहे. मागे शासनाच्या पोर्टलमधील मृतांची संख्या व मनपाकडून मिळणारी संख्या यात मोठी तफावत होती. त्यानंतर त्यात सुधारणा करण्यात आली.

  • कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटे दरम्यान अनेकांचा मृत्यू घरी झाला असेल. त्याची नोंद शासकीय अहवालात झाली नाही.

  • 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळवण्यासाठी अनेकांनी खोटे अर्ज दाखल केली असण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या