Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik NMC Election : भाजपकडून 'यांना' मिळाले एबी फॉर्म; शिंदेंची शिवसेना आणि...

Nashik NMC Election : भाजपकडून ‘यांना’ मिळाले एबी फॉर्म; शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही उमेदवार जाहीर

नाशिक | Nashik

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज (मंगळवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येक पक्षांकडून एबी फॉर्म मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. तर काही पक्षांनी उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करत उमेदवारी जाहीर केली आहे. यात भाजपमध्ये अखेरच्या क्षणी उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले आहेत.

- Advertisement -

भाजपने प्रभाग १२ मधून शिवाजी गांगुर्डे, राजेंद्र आहेर, वर्षा येवले आणि नुपूर सावजी यांना एबी फॉर्म दिले आहेत. तर प्रभाग २४ मधून सुरेखा नेरकर, कल्पना चुंबळे, कैलास चुंबळे आणि राजेंद्र महाले यांना तर प्रभाग ७ मधून योगेश हिरे, स्वाती भामरे, हिमगौरी आडके आणि सुरेश पाटील यांना एबी फॉर्म दिले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक २७ मधून प्रियांका दोंदे, ज्योती कवर, कावेरी घुगे आणि रामदास दातीर यांना एबी फॉर्म मिळाले आहेत.

YouTube video player

तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी (अ.प) युतीकडून किरण दराडे आणि नितीन दातीर यांना शिवसेनेकडून तर आशा खरात आणि किरण राजवाडे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. याशिवाय भाजपकडून प्रभाग ३१ मधून बाळकृष्ण शिरसाठ, पुष्पा आव्हाड, पुष्पा पाटील नवले आणि भगवान दोंदे यांना संधी देण्यात आली आहे. तर रिपब्लिकन सेनेने अविनाश शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दुसरीकडे भाजपने प्रभाग १० मधून विद्यमान नगरसेवक शशिकांत जाधव यांना उमेदवारी नाकारली आहे. या प्रभागातील भाजपचे चारही एबी फॉर्म वितरीत झाले आहेत. पंरतु, शशिकांत जाधव फॉर्म दाखल करण्यासाठी उपस्थित झाले आहेत. मात्र, पक्ष कोणता हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. तर प्रभाग २५ साठी सुधाकर बडगुजर यांनी चार कोरे फॉर्म नेले आहेत. याशिवाय आरपीआयकडून दीक्षा लोंढे व प्रकाश लोंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रातून आता पावसाचे अपडेट

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे लहरी, खराब हवामानामुळे शेतकर्‍यांना अनेकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रोजेक्ट प्रकल्प...