Friday, February 20, 2026
HomeनाशिकNashik NMC Politics : स्वीकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी? इच्छुकांकडून लॉबिंग, घोषणा कधी?

Nashik NMC Politics : स्वीकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी? इच्छुकांकडून लॉबिंग, घोषणा कधी?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका निवडणुकीनंतर (Municipal Corporation) आज (शुक्रवारी) पहिलीच महासभा (Mahasabha) पार पडत आहे. आजच्या महासभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा विषय केंद्रस्थानी असून, दहा स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ही निवड पुढे देखील ढकलली जाऊ शकते. त्यासाठी इच्छुकांकडून राजकीय पक्षांकडे लॉबिंग सुरु आहे. यामुळे आता स्वीकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी लागणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून आहे.

- Advertisement -

महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी (Approved Corporators) सत्ताधारी भाजपच्या वाट्याला सुमारे सहा जागा येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा कमालीची वाढली असून, इच्छुकांची यादी सतत वाढत आहे. यामुळे प्रत्येक गट, प्रभाग व विधानसभा मतदारसंघातून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. भाजपमध्ये (BJP) नवे व जुने वाद पुन्हा वाढले असून वरिष्ठ नेते कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे.

YouTube video player

शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून नाशिकमधील तीन आमदारांच्या मतदारसंघांना प्रत्येकी दोन स्वीकृत नगरसेवक देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर, सर्वाधिक नगरसेवक निवडून देणाऱ्या पंचवटी विभागाला दोन जागा, नाशिक रोडला एक जागा आणि उर्वरित तीन जागा इतर भागांना देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सत्ताधारी आघाडीतील शिंदेसेना, तसेच विरोधी उबाठा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने स्थायीत जाण्याऐवजी स्विकृत घेण्यात रस दाखवल्याने त्यांच्याकडून एक नगरसेवक होणार असल्याचे समजते.

सभागृह नेते ठरणार

महासभा आज शुक्रवार (दि. २०) सकाळी ११.३० वाजता महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली आहे. या महासभेत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामकाजासह शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय चर्चेला येणार असून, सत्ताधारी व विरोधी गटातील पद‌नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. महासभेत सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा मुद्दा म्हणजे विरोधी पक्षनेतेपद. हे पद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे गेल्याने, पक्षाचे नगरसेवक प्रथमेश गिते यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे, सभागृहनेतेपद सत्ताधारी भाजपकडे राहणार असल्याने, या पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे नाव आघाडीवर आहे.

ताज्या बातम्या

PM Narendra Modi : भारतीय एआय आता जगासाठी – पंतप्रधान मोदींचा...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi भारताची विविधता आणि व्याप्ती ही जागतिक संशोधनासाठी एक आदर्श चाचणी भूमी आहे. जे एआय मॉडेल भारतात यशस्वी ठरते,...