Saturday, September 12, 2026
HomeनाशिकSSC Exam 2026 : आजपासून दहावीची परीक्षा; नाशिक जिल्ह्यातील ९६ हजार विद्यार्थ्यांचा...

SSC Exam 2026 : आजपासून दहावीची परीक्षा; नाशिक जिल्ह्यातील ९६ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा (SSC Exam) आजपासून सुरू होत आहे. नाशिक विभागांतर्गत (Nashik Division) येणाऱ्या नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतून एकूण २ लाख ६ हजार ६११ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

- Advertisement -

परीक्षेचा पहिला पेपर मराठी विषयाचा (Marathi Subject) असणार आहे. विभागात नाशिक जिल्ह्याचा टक्का सर्वाधिक असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातून ९६,६३४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेचे नियोजन चोख व्हावे, यासाठी जिल्ह्यात २२४ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसलेल्या १५३७ विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे. नाशिक विभागातील ४२२ दिव्यांग विद्यार्थ्यांना (Student) लेखनिक (रायटर) पुरवण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...