Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik NMC News : प्रभागरचना जाहीर झाल्याने महायुतीमधील वादावर पडदा, पण पुढे...;...

Nashik NMC News : प्रभागरचना जाहीर झाल्याने महायुतीमधील वादावर पडदा, पण पुढे…; नेमकं काय होणार?

नाशिक | Nashik

राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) सूचनेनुसार काल (शुक्रवारी) नाशिक महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. मागील निवडणुकीप्रमाणे २०११ च्या लोकसंख्येचा आधार, १२२ सदस्य संख्या, चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणि प्रभागरचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना ‘जैसे थे’ राहिली आहे. त्यामुळे आता महायुतीतील वादावर पडदा पडला आहे. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते महापालिका निवडणुका (NMC Election) एकत्र लढणार असल्याचे सांगत असले तरी ते निवडणुका एकत्र लढणार का? याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

प्रभागरचनेतील बदलावरून महायुतीत (Mahayuti) वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर थेट भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (BJP and Ajit Pawar NCP) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. नगरविकास विभागाकडे प्रारुप प्रभागरचना सादर केल्यानंतर त्यात मोठ्या स्वरुपात फेरबदल झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. कारण नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने या प्रभागरचनेवर शिंदेंच्या शिवसेनेचा प्रभाव राहील असे बोलले जात होते. मात्र प्रभागरचनेत कोणताही बदल न झाल्याने महायुतीमधील वाद क्षमण्याची शक्यता आहे.

YouTube video player

दरम्यान, मागील निवडणुकीवेळी नाशिक महापालिकेचे (Nashik NMC) चार सदस्यीय २९, तर प्रभाग क्र.१५ आणि १९ हे तीन सदस्यीय दोन प्रभाग मिळून असे ३१ प्रभाग होते. ते यंदाही कायम राहिले आहेत. तर राज्य सरकारने जारी केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार या प्रभागरचनेवर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहेत. त्यावर १२ सप्टेंबरपर्यंत सुनावणी (Hearing) घेतली जाणार आहे.

ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभागरचना

राज्य निवडणूक आयोग ०६ ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणार आहे. प्रभागरचना अंतिम केल्यानंतर मतदारयादी (Voter List) तपासणीचा कार्यक्रम दीड महिने चालेल. यात हरकती व सूचनांचादेखील समावेश असणार आहे. त्यामुळे साधारण पुढील वर्षी जानेवारीत निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

४८ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग

प्रभागरचना करताना लोकसंख्येच्या (Population) प्रगणक गटांची जुळवणी करण्यात आली आहे. या पद्धतीनुसार प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या निश्चित करण्यात आली असून, यामध्ये सुमारे ४८ हजार नागरिकांचा समावेश झाला आहे. नाशिक महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकी राजवट आहे. त्यानंतर आता शुक्रवारी महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाल्याने निवडणुकीच्या हालचालींना अधिक वेग येणार आहे.

नाशिक महापालिकेतील पक्षीय बलाबल (२०१७ सालचे)

भाजप -६६ , शिवसेना-३५, मनसे -५, काँग्रेस – ६,राष्ट्रवादी काँग्रेस – ६ , अपक्ष – ३ आरपीआय (ए) – १

‘अशी’ होती २०१७ ची आरक्षण स्थिती

सर्वसाधारण – ६२
ओबीसी – ३३
अनुसूचित जाती – १८
अनुसूचित जमाती – ०९
महिला आरक्षण – ६
एकूण जागा – १२२

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...