Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Political : देवळालीतील बंडखोरांना दुसऱ्या पक्षांचे अभय

Nashik Political : देवळालीतील बंडखोरांना दुसऱ्या पक्षांचे अभय

नाशिक | दिगंबर शहाणे
कोणत्या पक्षाला कुठली जागा सुटणार व कोणाला उमेदवारी मिळणार, हे आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर देवळाली मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जाणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र ऐनवेळेस महाविकास आघाडीच्या तीनही पक्षात एकमत होऊन ही जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आली व त्यानंतर या जागेवर अपेक्षेप्रमाणे माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी मिळाली. आता मात्र जे बंडखोर आहे त्यांना इतर पक्षांचा अभय मिळाला असला तरी त्यांचा या निवडणुकीवर व इतर उमेदवारावर काय परिणाम होतो हे निवडणूक निकालानंतरच समजेल.

लोकसभा निवडणुकीनंतर देवळाली मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील शरद पवार गटाला मिळणार असल्याचे निश्चित झाले होते. त्या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी करण्यात येऊन व मुलाखतीसुद्धा घेण्यात आल्या होत्या. तब्बल २० उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक होते. मात्र २० उमेदवारांपैकी प्रबळ असा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद काय, त्यामुळे अखेर ही जागा अंतिम चर्चेनंतर शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आणि त्यानंतर लगेच उमेदवारी मिळविण्यात योगेश घोलप यांनी बाजी मारली.

- Advertisement -

हे ही वाचा: आमदार फरांदेंकडून 58 हजार लाडक्या बहिणींची भाऊबीज गोड

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी या मतदारसंघात सध्या १८ उमेदवार रिंगणात असले तरी अंतिम चित्र चार नोव्हेंबरच्या माघारीनंतर स्पष्ट होणार आहे. या १८ उमेदवारांमध्ये रविकिरण घोलप हे घोलप कुटुंबियातील असले तरी या अगोदरच घोलप कुटुंबीयांनी त्यांच्याशी कौटुंबिक संबंध तोडले आहे. रविकरण घोलप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार आहे तर रामदास सदाफुले व तनुजा घोलप तसेच राजश्री अहिरराव हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. मात्र यातील राजश्री अहिरराव यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या १५ मिनिटे अगोदर शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार व विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना एक प्रकारे धक्का बसला आहे तर तनुजा घोलप सध्या तरी रिंगणात असल्या तरी ४ तारखेपर्यंत माघार घेता की नाही याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

रामदास सदाफुले हे सुद्धा आपली उमेदवारी कायम ठेवतील की नाही, हे काळच ठरविणार आहे. संतोष साळवे, सुनील कोथमीरे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील की माघार घेतील, याकडे लक्ष लागले आहे. संतोष साळवे मात्र निवडणूक लढविण्यावर ठाम असून या संदर्भात त्यांनी समर्थकांचा मेळावासुद्धा दोन नोव्हेंबर रोजी आयोजित केला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा: आ. ढिकलेंकडून नागरिकांना दिवाळी शुभेच्छा

तसेच विनोद गवळी यांना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची उमेदवारी मिळाली असून त्यांनीसुद्धा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती तर मोहिनी जाधव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी मिळाली आहे. आता अधिकृत पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, मात्र इतर अपक्ष उमेदवारांपैकी कोण माघार घेणार, याकडे लक्ष लागले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. अविनाश शिंदे यांनाही पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. तर बहुजन समाज पार्टीचे राजू मोरे हे सुद्धा आपले नशीब आजमावणार आहे. इतर अपक्ष उमेदवारांमध्ये लक्ष्मी ताठे, अमोल कांबळे, कृष्णा पगारे, दिलीप मोरे, प्रकाश दोंदे, भारती वाघ हे उमेदवार सध्या तरी निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र अंतिम चित्र चार तारखेनंतरच स्पष्ट होईल. परंतु सध्या जे उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून व महाविकास आघाडीकडून इच्छुक होते, त्यांना इतर पक्षाने अभय देऊन उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक चार तारखेनंतर रंगतदार होईल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या