Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Political : कळवण-सुरगाण्याचा सिंचन प्रश्न सोडवण्यासाठी आ. नितीन पवार यांच्या पाठीशी...

Nashik Political : कळवण-सुरगाण्याचा सिंचन प्रश्न सोडवण्यासाठी आ. नितीन पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा

शेतकरी संघटना नेते देवीदास पवार, मविप्र माजी संचालक अशोक पवार यांचे आवाहन

कळवण | प्रतिनिधी | Kalwan

कळवण तालुक्याला (Kalwan Taluka) धरणांचा तालुका म्हणून स्व. ए. टी. पवार यांच्यामुळे ओळख मिळाली असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांनी कळवण तालुक्यातील ओतूर, जामशेत व सुरगाणा तालुक्यात श्रीभुवन धरणांना मंजुरी मिळवून निधी आणला. प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या खोट्या भूलथापांना बळी न पडता कळवण व सुरगाणा तालुक्यातील १०० टक्के सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार नितीनभाऊ पवार यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रांतिक उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : नांदगावला कळवाडी गटात समीर भुजबळांची बैलगाडीतून रॅली

राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) आमदार नितीनभाऊ पवार यांच्या प्रचारार्थ तालुक्यात गावनिहाय शेतकरी बांधवांच्या ठिकठिकाणी गाठीभेटी, छोटेखानी बैठकाचे आयोजन करण्यात येत आहे. नवीबेज येथील प्रचार दौऱ्यावेळी शेतकरी नेते देवीदास पवार बोलत होते. पवार यांनी पुढे सांगितले की, स्व ए टी पवार यांनी अर्जुनसागर (पुनंद) धरण बांधून सुळे व सुपले उजव्या व सुळे डाव्या कालव्याच्या व चणकापूर उजव्या कालव्याच्या माध्यमातून तालुक्याचे नंदनवन केले. शेतकरी बांधवाच्या शेतात पाणी पोहोचवले, सिंचन क्षेत्रात वाढ केली, तालुक्यातील शेतकरी बांधवानी वेगवेगळे पिके घेतल्यामुळे ङ्ग आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहे. पिण्याचे पाणी व सिंचनासाठी कळवणसह सुरगाणा तालुक्यातही स्व. ए.टी. पवार यांच्या प्रमाणे विकासाचा ध्यास आमदार नितीनभाऊ पवार यांनी घेतला असल्याचे सांगितले. कळवण सुरगाणा तालुक्यात सिमेंट बंधाऱ्यांचे जाळे विणले त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली. कळवण व सुरगाणा तालुक्यातील शेकडो कामे राज्य सरकारकडे प्रस्तावित केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या माध्यमातून ती कामे पूर्ण करण्यासाठी त्यांच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी कळवण सुरगाणा तालुक्यातील जनतेने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन शेतकरी नेते देवीदास पवार यांनी केले आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : ‘प्रचंड’ विकासकामांमुळे झिरवाळांचा विजय निश्चित

यावेळी मविप्रचे माजी संचालक अशोक पवार यांनी सांगितले की, नवीबेज येथे १० लाखाचा काँक्रेटीकरणाचा रस्ता मंजूर झाला होता. तो रस्ता या माजी आमदाराने जिल्हा नियोजन समितीला पत्र देऊन काम नामंजूर केले. दिलेले दान परत घेत नाही हि आपली संस्कृती असतांना निधी परत गेला. विशेष म्हणजे हा रस्ता माकपाचे कार्यकर्ते ज्या गल्लीत राहत होते त्याच ठिकाणचा रस्ता होता. तसेच बेज – नाकोडा गिरणा नदीवर पूल मंजूर केला होता. त्यावेळी त्यांना आम्ही ह्या पुलासाठी निधी मिळविण्यात अपयश आले. येथील निधी शेजारील तालुक्यातील आमदार राहुल आहेर शेजारील तालुक्यात गेला. कामकाजावर आपलेपणाने लक्ष दिले पाहिजे असे असताना दुर्लक्ष करणारा दुर्बल आमदार या तालुक्याला नको आहे. पवार कुटुंबाशिवाय या मतदार संघाचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे जनतेने अपप्रचाराला बळी न पडता आमदार नितीनभाऊ पवार यांनाच पाठिंबा द्यावा असे आवाहन केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या