Thursday, January 8, 2026
HomeनाशिकNashik Political : नाशिक मध्यत महायुतीचा एक; आघाडीचे चार बंडखोर मैदानात

Nashik Political : नाशिक मध्यत महायुतीचा एक; आघाडीचे चार बंडखोर मैदानात

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरातील चारपैकी एक असलेल्या मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आघाडीसह महायुतीतदेखील बिघाडी झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महायुतीतील एकाने तर महाविकास आघाडीतील चौघांनी बंडखोरी करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे तो सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

महायुतीकडून भाजप आमदार देवयानी फरांदे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. तरी त्यांच्यासमोर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तरी ठाकरे गटाचे नेते माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी वंचित आघाडीत जाऊन उमेदवारी घेऊन अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, माजी नगरसेवक गुलजार कोकणी व अल्पसंख्याक काँग्रेसचे शहराध्यक्ष हनिफ बशीर यांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे महायुतीत एक तर आघाडीतील चार बंडखोरांमुळे मध्यची लढाई चर्चेत आली आहे. सोमवारी (दि. ४) दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत असून कोण-कोण माघार घेतो व कोण-कोण मैदानात राहतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: Nashik Political : नाशिक पश्चिममध्ये कोणाचे पारडे जड? बहुरंगी लढतीबाबत नागरिकांमध्ये चर्चा

YouTube video player

नाशिक एक मतदारसंघ असताना २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी कब्जा केला होता. २००९ मध्ये मध्य नाशिकची निर्मिती झाल्यावर महाराष्ट्र निर्माण सेनेचा आमदार निवडून आला होता. २०१४ मध्ये पुन्हा मध्यची जागा भाजपने घेतली तर २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत भाजपने मध्य नाशिकची जागा आपल्याकडे राखली आहे. आता पुन्हा भाजपने विद्यमान आमदारांवर विश्वास व्यक्त केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : ‘वारसां’ना किती मिळणार मतदारांची ‘पसंती’?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिका निवडणूक (Mahapalika Election) म्हटले की, केवळ पक्षीय राजकारण नव्हे, तर स्थानिक समीकरणे, आरक्षणाचे गणित आणि राजकीय वारसा यांचीही चर्चा...