Wednesday, December 4, 2024
HomeनाशिकNashik Political : नाशिक पश्चिममध्ये कोणाचे पारडे जड? बहुरंगी लढतीबाबत नागरिकांमध्ये चर्चा

Nashik Political : नाशिक पश्चिममध्ये कोणाचे पारडे जड? बहुरंगी लढतीबाबत नागरिकांमध्ये चर्चा

नाशिक | रविंद्र केडिया
नाशिक पश्चिम विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपला उमेदवार देत निवडणुकीत आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे कोणाचे पारडे जड होईल याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात लढत होणार हे निश्चित होते. मात्र त्यात तडका पडला तो इतर विविध पक्षांचा. त्यामुळे दुरंगी असणारी ही लढत टप्प्याटप्प्यात बहुरंगी झाली. निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वराज पार्टी, माकप यांच्यासह अनेक अपक्षांनी उड्या घेत आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे सरळ सरळ वाटणारी निवडणूक जास्तच किचकट होताना दिसून येत आहे.

उमेदवारनिहाय विचार केल्यास विद्यमान आमदार सीमा हिरे दोन पंचवार्षिक म्हणजे सलग दहा वर्षे या विभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा व हाताळलेल्या विविध विषयांच्या माध्यमातून जनसमुदाय जोडला गेलेला आहे. त्यामुळे त्या या निवडणुकीत आपला अधिकार सांगत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना दुभंगल्यानंतर संघटनेला बांधण्यासोबतच संघटना गतिमान करून सक्षम करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. लोकसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजयी करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

- Advertisement -

हे ही वाचा: Nashik Political : वणीत १०० कोटींपेक्षा जास्त कामे झिरवाळांनी केली : कड

या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील शिवसेना व मित्रपक्षांची मोट बांधून ते विजयाचा दावा करत आहेत. यासोबतच पूर्वाश्रमीचे भाजपचे कणखर कार्यकर्ते असलेले दिनकर पाटील यांनी मनसेनेकडून आपले आव्हान निर्माण केले आहे. विधानसभेच्या नाशिक पश्चिमच्या पहिल्या निवडणुकीत मनसेनेने बाजी मारली होती. त्यानंतर सलग दोन वर्षे भाजप सत्तेत राहिली. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा मनसेना गड काबीज करेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काम करण्याची वृत्ती सातपूर परिसरातील मतांच्या बेरजेचे राजकारण पाहता त्यांचे आव्हानही कडवे राहणार आहे.

कष्टकरी व कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत लढा उभारणारे कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या उमेदवारीमु‌ळे कामगार संघटना पदाधिकारी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. तसेच मालक वर्गदेखील त्यांना पाठबळ देण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा: Nashik Political : आमदार ढिकले यांनी पाच वर्षात केलेल्या कामांची पावती मतदारांकडून मिळणार – संतोष भोर

महापौरपदाच्या कारकिर्दीदरम्यान आलेले सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन या माध्यमातून दशरथ पाटील हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी जरी अपक्ष फॉर्म भरला असला तरी जनसामान्यांच्या भूमिकेतून आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या या गर्दीत विकासाचा प्रश्न अनुत्तरीत आहे. नवीन नाशिक, सातपूर परिसर हा मध्यमवर्गीय कष्टकरी कामगार व उद्योजकांचा संमिश्र वसाहतीचा परिसर आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या