Wednesday, June 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik District MP News : निधी मिळत नसल्याचा बंडखोर खासदारांचा दावा फोल!...

Nashik District MP News : निधी मिळत नसल्याचा बंडखोर खासदारांचा दावा फोल! निष्ठावंत राजाभाऊ वाजेंच्या कामाचे दिल्लीत कौतुक; भगरे, डॉ. बच्छाव यांनाही बरोबरीचा निधी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळत नाही. कामे खोळंबली आहेत, असे कारण पुढे करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात सामील झालेल्या बंडखोर खासदारांचा दावा आता सपशेल फोल ठरला आहे. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीची अधिकृत आकडेवारी समोर आली असून, विरोधी बाकांवर राहूनही नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी विकासकामांत मारलेली बाजी बंडखोरांचे डोळे उघडणारी आहे. अनेक मोठ्या ऑफर्स धुडकावून उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेल्या राजाभाऊ वाजेंच्या या कामगिरीचे गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत कौतुक होत आहे.

- Advertisement -

खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेंतर्गत सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या खासदारांना रस्ते, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे पाणी, शिक्षण आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी दरवर्षी पाच कोटी रुपयांचा निधी दिला जातो. म्हणजेच पाच वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी २५ कोटी रुपये मिळतात. निधी वाटपात विरोधकांना डावलले जाते हा बंडखोरांचा आरोप नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांच्या प्रगतीपुस्तकाने खोडून काढला आहे.

नाशिक लोकसभेच्या (Nashik Loksabha) विकासासाठी राजाभाऊ वाजे यांना १५.२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी २.१३ कोटी रुपये त्यांनी प्रत्यक्ष खर्च केले आहेत. एकूण मंजूर ८३ कामांपैकी १२ कामे पूर्ण झाली असून, ७१ कामे सध्या वेगात सुरू आहेत. वाजे यांच्या काम पूर्णत्वाचा दर १२.६% असून, त्यांनी १३.९% निधी प्रत्यक्ष लोकांच्या कामासाठी विनियोग केला आहे.

डॉ. शोभा बच्छाव यांना किती निधी?

धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव (Dr. Shobha Bachhav) यांना मतदारसंघाच्या विकासासाठी सुमारे १४.७० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यांनी सुमारे ८२.८० लाख रुपये खर्च केले आहेत. तर सुमारे १३.८७ कोटी रुपये शिल्लक असून, एकूण मंजूर ८१ कामांपैकी ०६ कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ७५ कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. बच्छाव यांच्या काम पूर्णत्वाचा दर ०६.९ टक्के इतका असून, त्यांनी ५.६ टक्के निधीचा वापर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी खर्च केला आहे.

भास्कर भगरेंनी किती निधी खर्च केला?

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना मतदारसंघाच्या विकासासाठी सुमारे १४.७० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यांनी सुमारे २.३१ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर सुमारे १२.३८ कोटी रुपये शिल्लक असून, एकूण मंजूर ९९ कामांपैकी ०७ कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ९२ कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. भगरे यांच्या काम पूर्णत्वाचा दर ०६.६ टक्के इतका असून, त्यांनी १५.८ टक्के निधीचा वापर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी खर्च केला आहे.

कोणाचा किती विकास?

निधी मिळत नसल्याची ओरड करणाऱ्या राज्यातील इतर बंडखोर खासदारांची आकडेवारी पाहिली, तर अनेकांना वाजेंपेक्षा जास्त निधी मिळूनही त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

फुटीर बंडखोर खासदारांपैकी कोणाला किती निधी?

संजय जाधव (परभणी)
एकूण मंजूर निधी- १४.०७ कोटी
खर्च केलेला निधी- ३.७८ कोटी
पूर्ण झालेली कामं- ५६ पैकी २५

संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम)
एकूण मंजूर निधी- १८.०६ कोटी
खर्च कलेला निधी- १.४२ कोटी
पूर्ण झालेली कामं- १०६ पैकी ७

संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई)
एकूण मंजूर निधी- १४.७ कोटी
खर्च केलेला निधी- १५ लाख
पूर्ण झालेली कामं- ४० पैकी ०

भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
एकूण मंजूर निधी- १४.७ कोटी
खर्च केलेला निधी- ७१ लाख
पूर्ण झालेली कामं- १३५ पैकी २

नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
एकूण मंजूर निधी- १९ कोटी
खर्च केलेला निधी- ५.०६ कोटी
पूर्ण झालेली कामं- ७९ पैकी २८

ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
एकूण मंजूर निधी- १८.५ कोटी
खर्च केलेला निधी- १.९७ कोटी
पूर्ण झालेली कामं- १३० पैकी २१

ताज्या बातम्या

default-featured-image

Gokul Gite MLA Oath: गितेंनी आमदारकीची शपथ घेताच सभागृहात ‘जय गिरीश...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर, नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते यांनी...