Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकMalegaon NMC Ward Reservation : मनपासाठी २१ प्रभागांचे आरक्षण निश्चित; मातब्बर नेत्यांचा...

Malegaon NMC Ward Reservation : मनपासाठी २१ प्रभागांचे आरक्षण निश्चित; मातब्बर नेत्यांचा मार्ग मोकळा

इच्छुक कार्यकर्ते निराश; महिलांसाठी प्रत्येक प्रभागात दोन जागा

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) आदेशानुसार येथील महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल २१ प्रभागातील ८४ वार्डांची आरक्षण (Ward Reservation) सोडत काढण्यात आली. या सोडतीत प्रभागात महिलांसाठी दोन जागा आरक्षित झाल्याने पक्षीय मातब्बर नेत्यांचा मार्ग मोकळा झाला असला तरी इतर इच्छुकांसाठी ही सोडत निराशा पट्टी टाकणारी ठरली असल्याचे चित्र दिसून आले आहे. यामुळे पक्षीय उमेदवारी नेत्यांच्या पदरी पडणार असल्याने उमेदवारीसाठी गत वर्षभरापासून पदरमोड करणारे इच्छुक काय भूमिका घेतात याची उत्सुकता येथे निर्माण झाली आहे.

- Advertisement -

महानगरपालिका निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर आज प्रभाग आरक्षण निश्चिती सोडत कार्यक्रम येथील कृष्णा लॉन्स प्रांगणात मनपा आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला. उपायुक्त हेमलता डगळे, पल्लवी शिरसाठ, हरिष डिंबर, सहाय्यक आयुक्त दिनेश मोरे, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, सचिन महाले, गजानन कापुरे, निवडणूक कक्ष प्रमुख साजीद अन्सारी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते अथर्व चारोटे, ज्ञानेश्वर अहिले व सोहम जाधव या बालकांच्या हस्ते आरक्षण सोडतीची चिठ्ठी काढण्यात आली.

YouTube video player

२१ प्रभागातील ८४ वार्ड आरक्षण यावेळी निश्चित केले गेले, यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ४ तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २ अशा ६ जागा प्रभाग १, २, ९, १० मध्ये निश्चित केल्या गेल्या, तर नागरीकांचा मागास प्रवर्गात एकूण २२ जागांपैकी ११ जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या. सर्वसाधारण प्रवर्गात ५६ जागांपैकी २८ पुरुष व २८ महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या. सर्वप्रथम अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर ओबीसी व सर्व साधारण जागेचे आरक्षण निश्चित झाले. प्रभागनिहाय आरक्षण जागांच्या चिठ्या यंत्रणेतर्फे बनविण्यात आल्या होत्या.

सोडतीच्या वेळी अधिकाऱ्यांतर्फे या चिठ्या उपस्थित विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांना दाखविण्यात आल्यानंतरच सोडतीची प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी आरक्षणासंदर्भात माजी महापौर निलेश आहेर, भाजप महानगरप्रमुख देवा पाटील यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन आयुक्त जाधव यांनी केले. राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार महिलांचे थेट आरक्षण सोडत काढण्यात येत असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

अनुसूचित जाती व जमातीच्या ६ जागा प्रभागातील लोकसंख्येनुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. यंत्रणेतर्फे आरक्षण सोडतीची यादी १७ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार असून २४ तारखेपर्यंत या संदर्भात हरकती नोंदविता येणार आहेत, अशी माहिती देत आयुक्त जाधव यांनी मतदारयादी १४ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द केली जाणार असून त्यावर हरकती व सूचना नोंदविता येणार आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरत मनपा निवडणूक यंत्रणेतर्फे मतदान केंद्र (Voting Centre) तसेच केंद्रातील आवश्यक सुविधा, अधिकारी, सेवकांची नियुक्ती या संदर्भात नियोमास प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गत तीन वर्षांपासून महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काल काढण्यात आल्याने नगरपरिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...