Monday, May 4, 2026
HomeनाशिकAshok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? ...

Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली धक्कादायक माहिती

नाशिक | Nashik

भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत असून, खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा देखील गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत त्याच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत १० गुन्हे नोंद असून यात आठ गुन्हे लैंगिक अत्याचाराचे आणि एक फसवणुकी व इतर एक गुन्हा आहे. तर शिर्डी आणि राहता पोलीस ठाण्यात खरातविरुद्ध दोन गुन्हे दाखल असून, त्याच्यावरील एकूण गुन्ह्यांची संख्या १२ वर पोहोचली आहे. त्यानंतर आज (मंगळवारी) एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत अशोक खरात प्रकरणाच्या सुरु असलेल्या तपासाबाबत माहिती दिली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : तब्बल ११२ पतसंस्था ‘सहकार’च्या रडारवर! सिन्नर-कोपरगाव-शिर्डी पट्ट्यात चौकशी

यावेळी त्या म्हणाल्या की,”पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अशोक खरात या गुन्ह्याचा तपास एसआयटी मार्फत करण्याचे आदेश दिले होते. २० मार्च पासूनचे गुन्हे आणि इतर असे ११ गुन्हे एसआयटीकडे तपासासाठी आहेत. यात तीन पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक असे २४ जणांचे पथक तपास करत आहे. अशोक खरातविरुद्ध नाशिकमध्ये १० आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दोन असे एकूण १२ गुन्हे नोंद आहेत. यातील ९ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत असून, दोन गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस आणि एक नाशिक पोलीस तपास करत आहे. याशिवाय खरात विरोधात नसलेले पण संबंधित गुन्ह्यांचा देखील तपास एसआयटी करत असल्याची माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.

पुढे त्या म्हणाल्या की,”एसआयटीकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी ८ गुन्हे महिला लैंगिक अत्याचाराचे, आणि इतर गुन्हे फसवणूक, सावकरी व अंधश्रद्धेशी संबंधित आहेत. याप्रकरणात ३० साक्षीदारांकडून तपास करण्यात आला असून, चौकशीतून आरोपी पीडित व्यक्तीच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत धमकी देत होता. तसेच महिलांना दैवी शक्ती असल्याचं सांगत कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामीची धमकी देत त्यांचे लैंगिक शोषण करत होता, असेही तपास अधिकारी सातपुते यांनी सांगितले. तसेच ईशान्यश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात दैवी शक्ती असल्याचे भासवून अंधश्रद्धा पसरवत होता असे देखील तपासातून समोर येत असल्याचे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Ravindra Erande Crime : एरंडेचा खरातप्रमाणेच अघोरी प्रथा, जादूटोणा; कार्यालयातून पक्ष्यांचे अवयव, सापाची कात, कवडी जप्त

सोशल मीडियावरील व्हिडीओ हटविले

एसाआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, “पीडित महिलांचे व्हायरल झालेले तब्बल ४ हजार ६५० व्हिडीओ लिंक्स सोशल मीडियावरून एसआयटीच्या टीमने हटविल्या आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वारंवार टाकणाऱ्या ग्रुपला बंद केले असून, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. तर अहिल्यानगर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.’ तसेच काही मिनिटांमध्ये नवीन काही अपलोड झाले असल्यास ते शोधून त्यांना रिपोर्ट करण्याचे काम एसआयटीची टीम करत असून,  चार जणांची टीम व्हिडिओवर लक्ष ठेऊन आहेत, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.

महिला फिर्याद देण्यासाठी धाडसाने पुढे

महिला अत्याचाराच्या संदर्भात दाखल आठही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबीय हे अतिशय धाडसाने समोर आले आहेत. त्यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर संशयित आरोपीवर कायदेशीर कारवाई करू शकलो. माध्यमांद्वारे मी सगळ्यांना आव्हान करू इच्छिते की या महिलांनी लोक काय म्हणतील या भीतीने अन्याय सहन केलेला आहे आणि आता अतिशय धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्या महिलांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ न पसरवणे हे आपल्या सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या जाळ्यात मुंबईचे उद्योजक; कोट्यवधींच्या मनी लाँड्रिंगचा शिर्डीतून पर्दाफाश, तेरावा गुन्हा नोंद

ताज्या बातम्या

Baramati Result : सुनेत्रा पवारांनी इतिहास रचला! बारामतीत रेकॉर्डब्रेक मतांनी विजय

0
बारामती । Baramati महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या नजरा लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत (Baramati By Election 2026) राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजयाचा नवा...