Friday, October 4, 2024
Homeनाशिकदेशदूत विशेष : बंडखोरीने शिवसेनेचे मोहोळ ओस!

देशदूत विशेष : बंडखोरीने शिवसेनेचे मोहोळ ओस!

नाशिक । रवींद्र केडिया | Nashik

मराठा तितुका मेळवावा ॥ महाराष्ट्र धर्म वाढवावा ॥ या घोषवाक्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या सामाजिक संघटनेने हिंदुत्वाच्या मुद्यावर देशपातळीवर राजकीय वर्तुळात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या हुंंकाराने महाराष्ट्र पेटून उठत होता. शब्दातील ताकद व संघटनेतील बळकटी या जोरावर बाळासाहेबांनी मोठमोठ्या नेत्यांना ‘मातोश्री’च्या उंबर्‍यावर उभे केल्याचा इतिहास आहे. मात्र गेल्या दोन दशकांत शिवसेनेने आपल्या कार्यशैलीत बदल केल्याचे दिसून येत आहे. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे सूत्र पुढे दृढ होत गेल्याने समाजाच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे नेते कालांतराने सत्तेत आल्याने मवाळ होत गेले.

- Advertisement -

पूर्वी एकच नेता ही भूमिका कालांतराने बदलत ‘अहं ब्रह्मासी’ या सूत्राकडे वळाल्याने एकसंघ शिवसेनेला गळती लागली. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे यांसारख्या कट्टर शिवसैनिकांनी सेनेला जय महाराष्ट्र केला. अलीकडच्या एकनाथ शिंदेंच्या महाबंडाने तर शिवसेनेची पाळेमुळेच हलवली. या बंडामुळे खरी शिवसेना कोणती या संभ्रमात गेलेला शिवसैनिक अद्यापही बाहेर आलेला नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे बांधबंदिस्तीतून पक्षाला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे भाजपच्या पाठबळावर राज्यात स्वत:चे वलय निर्माण करण्याची धडपड शिंदे गटाची सुरू आहे.

छगन भुजबळांचे राजकीय वजन कमी होतेय? नाशिकचे पालकमंत्री न झाल्याने चर्चांना ऊत

या धामधूमीत शिवसेनेवर, शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा सच्चा शिवसैनिक मात्र अजूनही संभ्रमावस्थेत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरी भाषेवर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते पक्षाच्या ध्येय धोरणांशी प्रतारणा झाली म्हणून नेत्यांच्या हाकेवर धावून जाणारे शिवसेनेचे मोहोळ मात्र ओस पडल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनाचा धाक असलेली संघटनाच खिळखिळी झाल्याने सच्चा शिवसैनिक व्यथित झाल्याने पक्षाच्या नावाने मतदान करणारे आता संभ्रमात दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी काळात या शिवसैनिकांच्या नकारात्मक मतांचा गंभीर परिणाम निवडणूक निकालावर होऊ शकतो यात तीळमात्र शंका नाही.

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाला भिडण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका! स्टार खेळाडूला डेंग्यूची लागण

- Advertisment -

ताज्या बातम्या