नाशिक | Nashik
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी मतदानास (Election Voting) सकाळी साडेसात वाजेपासून सुरुवात झाली आहे. विविध मतदान केंद्रांवर मतदारांची मतदानासाठी सकाळी गर्दी झाली असून, मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे.
येवला नगरपरिषद निवडणुकीसाठी (Yeola Nagarparishad Election) एका नव वधूने देखील बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला आहे. येवल्यातील फत्तेबुरुज नाका येथे प्रभाग क्रमांक ८ मधील मतदान क्रमांक १ मध्ये नववधू शुभदा शिंदे हिने मतदान केले. नवरदेवाच्या सजलेल्या गाडीतून ही नववधू मतदान केंद्रावर पोहोचली. यावेळी तिने विवाहाआधी लोकशाहीतील मतदानाचा अधिकार बजावला.
दरम्यान, मतदान केंद्रांवर (Voting Centre) पोलिसांचा (Police) कडेकोट बंदोबस्त असून, वयोवृद्ध मतदारांना उमेदवारांचे प्रतिनिधी मतदानासाठी मतदान केंद्रांवर घेऊन येताना बघायला मिळत आहे.




