Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Political : नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी; शिवसेनेने दिले राष्ट्रवादी विरोधात उमेदवार, पक्षाचे...

Nashik Political : नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी; शिवसेनेने दिले राष्ट्रवादी विरोधात उमेदवार, पक्षाचे एबी फॉर्मही जोडले

नाशिक | Nashik

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) अर्ज दाखल करण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या (Mahayuti and Mahavikas Aaghadi) उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी युती-आघाड्यांत मोठी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले असून महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांसमोर उमेदवार उभे करून त्यांना एबी फॉर्म दिले आहेत. यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी बंडखोरी किंवा मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : सुरगाण्यातील दहशतवादाला जशास तसे उत्तर; मानूर मेळाव्यात आ.नितीन पवारांकडून विरोधकांचा खरपूस समाचार

याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघात (Dindori and Deolali Constituencies) राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवारांसमोर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने उमेदवार उभे करत त्यांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांत बंडखोरी होण्याची शक्यता आहे.यात दिंडोरी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवाळ (Narahari Zirwal) यांच्याविरोधात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे माजी आमदार धनराज महाले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाले यांनी आपल्या अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : महायुतीच्या उमेदवारांसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरले उमेदवारी अर्ज

तर देवळाली विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवार सरोज आहिरे (Saroj Ahire) यांच्याविरोधात नाशिकच्या माजी तहसीलदार राजश्री आहिरराव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता आहिरराव यांच्या उमेदवारी अर्जाला शिवसेनेचा (Shivsena) (एकनाथ शिंदे) एबी फॉर्म जोडण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघात देखील महायुतीमध्ये बंडखोरी किंवा मैत्रीपूर्ण होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पाच उमेदवारांची यादी जाहीर; पंढरपूरात होणार मैत्रीपूर्ण लढत?

तसेच या दोन्ही मतदारसंघांनंतर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात (Nashik Central Assembly Constituency) देखील महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे (अजित पवार) शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thakare) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात देखील महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. तर नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीमधील शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे (अजित पवार) समीर भुजबळ यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता माघारीनंतरच विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या