नाशिक | Nashik
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या (Mahayuti and Mahavikas Aagahdi) उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर वरिष्ठ नेत्यांकडून आपआपल्या पक्षातील बंडखोरांना (Rebel) थंड करण्याचे प्रयत्न सुरु केले होते.अखेर वरिष्ठ नेत्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपल्या पक्षातील बंडोबांना थंड केले आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडीचे बंड शमले; डॉ.हेमलता पाटील यांची माघार
यात महायुतीमध्ये जिल्ह्यातील दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघात ( Dindori and Deolali Constituencies) बंडखोरी झाली होती. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली होती. दिंडोरीतून महायुतीकडून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याविरोधात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) धनराज महाले यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अर्ज माघार घेण्यासाठी अगदी शेवटची काही मिनिटे शिल्लक असतानाच धनराज महाले यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे झिरवाळ यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून आले.
हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला दिलासा मिळणार; ‘हे’ दोन तगडे नेते माघार घेणार?
तसेच देवळाली मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांना उमेदवारी देण्यात आली होती.त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) राजश्री अहिरराव यांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे अहिरे यांचे टेन्शन वाढले होते. त्यानंतर राजश्री अहिरराव नॉटरिचेबल झाल्या होत्या तेव्हापासून ते अर्ज माघारीच्या शेवटच्या मिनिटापर्यंत त्यांचा फोन नॉटरिचेबल असल्याने त्यांनी उमेदवारी कायम ठेवली असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून एक पत्रक काढण्यात आले असून त्यात आहिरराव यांनी अर्जासोबत जोडलेला पक्षाचा एबी फॉर्म रद्द करावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा