Friday, November 15, 2024
HomeनाशिकNashik Political : विधानसभेतही करेक्ट कार्यक्रम करा - खा. भगरे

Nashik Political : विधानसभेतही करेक्ट कार्यक्रम करा – खा. भगरे

सुनीताताई चारोस्करांच्या झंझावाती दौऱ्यांनी विरोधकांची धांदल

दिंडोरी | Dindori

दिंडोरी लोकसभा निवडणुकीत (Dindori Loksabha Election) धनशक्तीला गाडून जनशक्तीचा विजय झाला. विधानसभेत देखील धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे आता लोकसभेप्रमाणे विधानसभेतही करेक्ट कार्यक्रम करण्याचे आवाहन दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी केले.महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुनीता रामदास चारोस्कर (Sunita Charoskar ) यांच्या नावाची पसंती बाढतच असून, मतदारसंघातील प्रत्येक गटामध्ये वाढता पाठिंबा बघून विरोधकांची धावपळ उडाली आहे. त्यामुळे यंदा दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात महिला उमेदवार मिळणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : दिंडोरी-पेठला पहिली महिला आमदार लाभणार

कोचरगाव गटातील झंझावात दौरा आणि शेकडोंच्या महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाची खात्री आल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांची मतदार संघात क्रेझ वाढत आहे. गावोगावात गेल्यानंतर महिलांमध्ये सहभागी होवून महिलांच्या अडीअडचणी समजून घेतात. महिलांच्या मनामध्ये घर केल्याने आपल्या हक्काच्या आमदार मिळणार असा आशावाद महिलांकडून व्यक्त केला जात आहे. एकंदरीत दिंडोरी – पेठच्या मतदार संघामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद सुनीता चारोस्कर यांना मिळत आहे. गावोगावामध्ये तुतारीचा नाद घुमायला सुरुवात झाल्याने लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील तुतारी फुकणारा माणूस या निशाणीला घराघरातून पसंती मिळणार असल्याची चित्र दिसत आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : ॲड. राहुल ढिकले यांच्या नाशिकरोड प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

लोकनेते शरदचंद्र पवार यांनी आजपर्यंत महाराष्ट्राचा, देशाचा राजकारण करत असताना सर्वसामान्य तळागाळातील लोकांना नेतृत्व करण्याची वेळोवेळी संधी दिलेली आहे. पवार साहेबांनी महाराष्ट्राचे राजकारण करत असताना प्रत्येक मतदारसंघांमध्ये अनेक लोकांना ज्यांना राजकारणातलं ‘र’ माहित नाही अशा लोकांना पवार साहेबांनी ताकद देऊन उभारी दिली. परंतु याच लोकांनी पवार साहेबांसोबत, त्यांच्या विचारासोबत, जनतेच्या विश्वासासोबत गद्दारी केली. त्यामुळे जनता त्याना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दिंडोरी पेठ मतदार संघाचे गेल्या अनेक वर्ष राजकारण पाहता शरदचंद्र पवार, श्रीराम शेटे असतील यांनी सातत्याने आपली ताकद नरहरी झिरवाळांमागे उभी केली होती, परंतु शेवटी नरहरी झिरवाळ यांनी या राजकारणातील व सर्वसामान्य माणसाच्या हृदयातील देव माणसाचा विश्वासघात केला, विधानसभा उपाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर दिंडोरी पेठ तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. आमच्याकडे औद्योगिक वसाहात मोठ्या प्रमाणावर उभा राहतील, स्थानिक युवकांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रोजगार मिळेल आणि लोकांचे जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा होती. परंतू पदरी निराशा पडल्याने यंदा परिवर्तन घडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

झिरवाळ मतदार संघाच्या नाही तर स्वतःच्या विकासासाठी गेले – पिंगळे

देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधानपदी महिलांनी देश सांभाळत आपण सक्षम असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर शरद पवारांची साथ सोडत अजय दादांसोबत गेले. आपण विकासासाठी अजितदादा सोबत गेल्याची सांगितले. परंतु मतदारसंघात कुठेही विकास दिसला नाही. मात्र स्वतःचा विकास करून घेतला. जरा साहेब नेमके मतदार संघाच्या विकासासाठी पवार साहेबांचे साथ सोडली की स्वतःच्या विकासासाठी? असा सवड राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळे यांनी भर सभेमध्ये विचारला विचारतात टाळ्यांचा कडकडाट होत त्यास उपस्थितीत नागरिकांनी प्रतिसाद दिला.

दिंडोरीत शरद पवारांच्या विचारांची ‘तुतारी’ वाजणार

दिंडोरी – पेठ मतदार संघामध्ये आता जनतेमध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण झालेले आहे. त्यांना अपेक्षा आहेत आता सुनीताताई चारोस्कर यांच्याकडून त्या तरी या मतदार संघांमध्ये चांगल्या पद्धतीने विकास काम करतील व दिंडोरी पेठकरांच्या पदरी पडलेली निराशा सुनीताताई चारोस्कर ह्या त्यांच्या कामाच्या माध्यमातून दूर करतील असा सगळीकडे बोलबाला चालू आहे. आता दिंडोरी पेठ व ग्रामीण मतदारसंघाचा वाढता पाठिंबा पाहता सुनिता रामदास चारोस्कर यांची मोठी जबाबदारी आता वाढली आहे. सर्वसामान्य जनतेच्या व युवक, युवती, महिला, शेतकरी व मजुरांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना खात्री आहे की सुनीताताई रामदास चारोस्कर ह्या त्यांना न्याय देतील आणि म्हणून आता दिंडोरी पेठ विधानसभेमध्ये परिवर्तन करण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेचा वाढता पाठिंबा बघता विरोधकांची धांदल उडाली आहे. आता विकासाच्या मुद्यावर बोलण्यासारखे काही नसल्याने ते आता गुद्याची, गुंडागिरीची, बघून घेण्याची भाषा करायला लागलेले आहेत. यातून विरोधकांचा पराभव त्यांनी आता मनातून स्वीकारलेला असल्याचे दिसून येते. त्यामुळे फडफडणारी वाद आता कायमची जनता विझवणार आहे आणि या मतदारसंघात नव्याने जनता शरद पवार साहेबांच्या विचारांची तुतारी वाजवणार आहे आणि हीच तुतारी जनतेला परिवर्तनाच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरीत करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या