नाशिक | फारूक पठाण | Nashik
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरू आहे. प्रचार ऐन शिगेला पोहोचला आहे. सर्व पक्षांचे मोठमोठ्या नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी होत असून प्रत्येक जण आपला उमेदवार (Candidate) आमदार व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहे तर दुसरीकड नाशिक शहरात विधानसभा निवडणुकीत काही जण आगामी महापालिका निवडणुकीची तयारी करत असल्याचे दिसत आहे. १९९२ पासून नाशिक महापालिकेची निवडणूक दर पाच वर्षांनी नियमित झाली आहे, मात्र २०१७ मध्ये स्थापन झालेली महापालिकेची कार्यकारणी २०२२ मध्ये कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे बरखास्त झाली. यानंतर मात्र करोना तसेच ओबीसी आरक्षणासह इतर काही कारणांनी नाशिक महापालिकेची निवडणूक आतापर्यंत झालेले नाही. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा २०२२ मध्ये प्रशासकीय राजवट सुरू झाली. आता महापालिका निवडणुका कधीही होण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध पक्षांचे व अपक्ष इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीत आपल्या नगरसेवक निवडणुकीची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : ॲड. राहुल ढिकले यांच्या नाशिकरोड प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
नाशिक शहरातील मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात (Nashik Central Assembly Constituency) महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे तर वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवार दिल्यामुळे रंगत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह महायुतीतील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच भारतीय जनता पक्ष यांच्यासह इतर लहान पक्षांचे नेते देखील प्रचारात उतरले आहे. जो तो आपल्या नेत्याला आमदार करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे, तर याच दरम्यान काही नेते विधानसभा निवडणुकीनंतर जर लगेचच नाशिक महापालिका निवडणूक लागली तर त्यासाठी देखील आपली तयारी असायला पाहिजे त्या दृष्टीने देखील कामाला लागल्याचे दिसत आहे. यामध्ये घरोघरी प्रचार करीत असताना आपली ओळख करून देण्यात येत असल्याचे काही ठिकाणी दिसून आले आहेत.
हे देखील वाचा : दिंडोरी-पेठला पहिली महिला आमदार लाभणार
मध्य नाशिक मतदारसंघात नगरसेवक (Corporater) होण्यासाठी इच्छुक असलेले नेत्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. २०२२ साली जेव्हा नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट लागली त्यावेळी मोठ्या प्रमाणात शहरात इच्छुक तयार झाले होते.त्यावेळेस राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शासनाने निवडणुकीची तयारी देखील सुरू केली होती तर शहरातील प्रभाग रचना देखील जवळपास अंतिम झाली होती. तर मतदार यादीचे काम देखील अंतिम टप्प्यात आले होते. पहिले एक वार्ड या पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आले होते, मात्र नंतर दोन व पुन्हा तीन व चार याप्रमाणे प्रभाग रचना होणार असल्याचे चर्चा आल्या होत्या, मात्र त्यानंतर राज्यातील सरकार बदलले.
हे देखील वाचा : Nashik Political : मतदार प्रा. फरांदे यांना मंत्रिपदी पोहोचवणार; माजी नगरसेवक संजय बागूल यांचा विश्वास
महायुतीचे सरकार (Mahayuti Government) सत्तेत आले व मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तेव्हाही असे वाटले होते की राज्यातील महापालिकांसह नाशिक महापालिकेची निवडणूक होणार, मात्र त्यावेळेस देखील निवडणूक झाली नाही. काळांतराने २०२४ ची लोकसभा निवडणूक लागली. त्यावेळी देखील लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी नाशिक महापालिकेची निवडणूक होणार असे चित्र निर्माण झाले होते. त्या दृष्टीने देखील इच्छुकांनी तयारी सुरू केली होती, मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता विधानसभा निवडणूक लागली तरी महापालिका निवडणूक झाली नाही. आता इच्छुकांच्या मते विधानसभा निवडणूक झाल्यावर नाशिक महापालिके ची निवडणूक लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणून इच्छुक त्या दृष्टीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातच आपल्या महापालिका निवडणुकीचे देखील तयारी करून ठेवत आहे. ज्यामुळे उद्या निवडणुका लागल्या तर आपल्याला जड जाणार नाही. त्या दृष्टीने देखील नियोजन सुरू असल्याचे दिसून येत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा