Friday, November 15, 2024
HomeनाशिकNashik Political : 'प्रचंड' विकासकामांमुळे झिरवाळांचा विजय निश्चित

Nashik Political : ‘प्रचंड’ विकासकामांमुळे झिरवाळांचा विजय निश्चित

खेडगाव, शिंदवड, तिसगाव घड्याळमय; मतदारांचा प्रचंड उत्साह

दिंडोरी | Dindori

ना. नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी प्रचंड विकासकामे खेडगाव गटात (Khedgao Group) केली आहे. अनेक रस्त्यांचे जाळे, अनेक ग्रामपंचायतीच्या इमारती, अनेक आरोग्य केंद्रे, मंदिरे, सभामंडपे, पाण्याच्या सुविधा, शैक्षणिक संकुले आदी ना. झिरवाळांनी उभे केले आहे. ना. झिरवाळांचा स्वभाव साधासरळ आहे. त्यांनी कधीही विकासकामे करतांना दुजाभाव केला नाही. केंद्रात महायुतीचे सरकार आहे. राज्यातही महायुतीची सत्ता येणार आहे. उद्या आपल्याला झिरवाळांना कुठे गाठता येईल व विकासकामे करता येईल. ना. झिरवाळ हे त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे व विकासाकामांमुळे पुन्हा निवडून येतील, खेडगाव गटातून त्यांना प्रचंड मते देवू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार यांनी केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : विधानसभेतही करेक्ट कार्यक्रम करा – खा. भगरे

खेडगाव गटात महायुतीचे उमेदवार ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचार दौरा संपन्न झाला. या प्रचार दौऱ्याप्रसंगी सभेचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ॲड. पगार बोलत यांनी मतदारांना आवाहन केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील होते. व्यासपीठार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार, माजी आमदार धनराज महाले, सहकार नेते सुरेश डोखळे, दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील बच्छाव, ज्येष्ठ नेते प्रकाश शिंदे, विश्वासराव देशमुख, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर पगारे, रिपाइंचे रविकुमार सोनवणे, भाजप महिला तालुकाध्यक्षा उज्वला उगले आदी महायुतीचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा : दिंडोरी-पेठला पहिली महिला आमदार लाभणार

यावेळी ॲड. रविंद्र पगार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मी ९६ कुळी मराठा असून ना. नरहरी झिरवाळ यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सतत प्रयत्न केले आहे. ना. नरहरी झिरवाळ यांना जरांगे पाटील सुध्दा कौतुकाचे शब्द काढतात. अनेक मराठा संघटनांनी ना. झिरवाळांच्या प्रचारात भाग घेतला असून त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. अशा सर्व समावेशक नेतृत्वाला आपल्याला पुन्हा विधानभवनात बघायचे आहे. खेडगाव परिसरात मिळालेल्या प्रतिसादामुळे ना. नरहरी झिरवाळ जिल्ह्यात (District) एक क्रमांकाच्या विजयी मतांची आघाडी घेतील, असा विश्वास ॲड. रविंद्र पगार यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा : Nashik Political : ॲड. राहुल ढिकले यांच्या नाशिकरोड प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

ॲड. रविंद्र पगार म्हणाले की, ना. नरहरी झिरवाळ यांनी महाराष्ट्रातील कोणत्याच मंत्र्यांनी आपल्या मतदार संघात जेवढा निधी नेला असेल त्याच्या दुप्पट ना. झिरवाळांनी दिंडोरी पेठ मतदार संघात निधी आणून विकासकामे केले आहे. तालुक्यात जे काही दोन चार पुढारी आहे ते ठेकेदार पुढारी आहेत. ते त्यांच्या दुकानदारी चालवण्यासाठी ना. झिरवाळ यांच्यावर खोटेनाटे आरोप करतात. परंतू अशा पुढाऱ्यांना जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे ॲड. पगार म्हणाले. यावेळी माजी आमदार धनराज प्रचंड मतांधिक्य ना. झिरवाळ यांना मिळवून देवू, असे आश्वासन झिरवाळांच्या विजयासाठी काम करीत असल्याचे धनराज महाले यांनी सांगितले. यावेळी सर्व खेडगाव गटातील रिपाइंची मते ना. झिरवाळांच्या पदरात टाकण्याचे आश्वासन रिपाइंचे रविकुमार सोनवणे, रत्नाकर पगारे, दिंडोरीचे सागर पगारे यांनी ना. झिरवाळ यांना दिले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थ, महिला, युवक, युवती उपस्थित होते.

विकासकामांमुळे तिसगावकर झिरवाळांच्याच पाठीशी

तिसगाव येथे ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचार सभेत तिसगाव येथील ग्रामस्थांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच आमच्या गावात जुने साहेब आले होते. आम्ही त्यांच्याबरोबर सभेत बसलो होतो. परंतू त्यावेळी आम्ही मतदान करा असे कुणीही बोलले नाही. विद्यार्थ्यांना ७ कि.मी. पायी जावे लागत होते. परंतू ना. झिरवाळ यांनी दोन कोटी रुपये निधी मंजूर करुन पूल तयार होवून वाहतूकही सुरु झाली आहे. ढंगे वस्ती या रस्त्याचे काम सुरु आहे. मारुती मंदिरालाही निधी दिला आहे. तीसगाव ते शिंदवड या रस्त्याचेही काम सुरु आहे. तीसगाव येथील महादेव मंदिराचा परिसर सुशोभीकरण करुन दिले आहे. दशक्रिया विधी शेडचे काम तसेच पाणीपुरवठ्यासाठी दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. तालुक्यात अशी कोणत्याच गावात स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. दलित वस्तीसाठी ५० लाखाचा निधी दिला आहे. तसेच गावातील अनेक ठिकाणी सिमेंटीक्रॉटीकरणाचे सुरु आहे. गावातील गाजलेला पहिलवानाला अपघातात पाय गमवावा लागला होता. तेव्हा ना. झिरवाळ यांनी मुंबई येथे तीन महिने दवाखान्यात उपचार करण्यास सांगून मदत केली. त्यामुळे ना. झिरवाळ यांच्याकडे माणूसकीचा धर्म आहे. त्यामुळे तीसगाव परिसर हा संपूर्ण ना. झिरवाळांच्या पाठीमागे असून घड्याळालाच मतदान करण्याचा निश्चय तीसगावकरांनी केला आहे.

खेडगाव गटात घड्याळ्याला वाढता पाठिंबा

खेडगाव गटात सहकार नेते सुरेश डोखळे यांनी सर्वत्र आपल्या कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांना ना. झिरवाळांच्या प्रचारात कामाला लावले आहे. त्यामुळे दोन्ही गटाची ताकद ना. झिरवाळ यांच्या पाठीशी उभी झाली आहे. खेडगाव गटात विक्रमी मतदान पडेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यात खेडगाव गटात अजित पवार यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पवार यांना मानणारा वर्ग घड्याळ्याच्या मागेच उभे राहणार आहे. तिसगाव, खेडगाव, शिंदवड, बोपेगाव, सोनजांब, जोपुळ, लोखंडेवाडी, मातेरेवाडी आदी गावांमध्ये ना. झिरवाळांना मिळालेला पाठिंबा पाहता विरोधकांची दांडी गुल झाल्याचे मत राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाई, भाजप कार्यकत्यांनी बोलुन दाखविले.

क्षणचित्रे

ना. झिरवाळांचे आगमन होताच खेडगाव येथे फटाक्यांची जोरदार आतशबाजी
ना. झिरवाळ यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण झिरवाळांचे भाषण संपूर्ण विकासावर
ना. झिरवाळांच्या पाठीमागे स्वयंस्फूतीने कार्यकर्ते सहभागी
खेडगाव गटात झंझावती दौरा

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या