Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Political : नाशिकचे पालकमंत्री कोण?

Nashik Political : नाशिकचे पालकमंत्री कोण?

भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीत चुरस

नाशिक | फारुक पठाण | Nashik

राज्य मंत्री मंडळाचा पहिला विस्तार (Expansion of Cabinet) झाला असून, यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तब्बल ३९ जणांचे मंत्रिमंडळ तयार झाले आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाला तरी अद्याप खातेवाटप व पालकमंत्री यांची यादी जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा पालकमंत्री (Guardian Minister of Nashik) कोण होणार?, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.यंदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पालकमंत्री होणार, अशी देखील चर्चा होती, मात्र त्यांना मंत्रीपदच न दिल्याने ते आपोआपच शर्यतीतून बाहेर आले आहेत. मात्र, भाजपकडून गिरीश महाजन, सेनेकडून दादा भुसे तर राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ व अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यात चुरस असल्याचे समजते.भुसे, कोकाटे व झिरवाळ नाशिक जिल्ह्यातील असून महाजन हे जळगांवचे आहेत.

- Advertisement -

२३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) निकाल आला तर ६ डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला. त्यामुळे आता चर्चा आहे ती नाशिकचा पालकमंत्री कोण याचीच. महाविकास आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्रीपद भूषवले आहे. तर युती सरकारमध्ये गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होते. सत्ता बदलानंतर महायुतीत शिवसेनेचे दादा भुसे (Dada Bhuse) आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आली होती. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री असलेले सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी नाशिकचे पालकमंत्रीपद दादा भुसे यांना दिले होते. भुसे हे आता पाचव्यांदा निवडून आल्याने तसेच शिवसेनेचा गड मजबूत करण्यासाठी भुसे यांनाच पुन्हा पालकमंत्री पद देण्याबाबत शिवसेना सध्या तरी आग्रही दिसत आहे.

तर दुसरीकडे संख्याबळाचा निकष विचारात घेतला तर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार विजयी झाल्याने त्यांच्याकडूनही पालकमंत्री पदावर दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून दिंडोरीचे ज्येष्ठ आमदार नरहरी झिरवाळ (Narahari Zirwal) किंवा सिन्नरचे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र राज्यात भाजपचा दबदबा वाढल्याने आणि आगामी कुंभमेळा तसेच आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार करता नाशिकवर पकड मजबूत करण्यासाठी भाजपकडून पालकमंत्री पदावर दावा केला जात आहे. भाजपकडून ज्येष्ठ नेते व संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे नाव पुढे चालू आहे. मागील कुंभमेळ्यात महाजन पालकमंत्री होते तर त्यांनी चोख नियोजन केले होते. तर २०१७ साली झालेल्या मनपा निवडणुकीत देखील महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांचे ते जवळचे मानले जातात. म्हणून पुन्हा एकदा कुंभमेळा समोर ठेवून महाजनांचे नाव चर्चेत आहे. असे असले तरी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे कोणाच्या गळ्यात नाशिकच्या पालकमंत्री पदाची माळ टाकतात, याकडे लक्ष लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...