त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Igatpuri
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना शिंदे पक्ष (Shivsena Shinde Group) यांची युती दोन्ही पक्षांच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे तसेच शिवसेनेचे (शिंदे) जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले यांनी युतीची घोषणा केली. १४ जागा राष्ट्रवादीला आणि सहा शिवसेनेला असे जागावाटप ठरले असल्याची माहिती माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता सत्ता यायला हवी असा संकल्प यावेळी करण्यात आला.
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत (Igatpuri and Trimbakeshwar Nagarparishad) सत्ता मिळेल असे आमदार हिरामण खोसकर म्हणाले. त्र्यंबकेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व नगराध्यक्षपदाचे दावेदार सुरेश गंगापुत्र यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष संपतराव सकाळे, शामराव गंगापुत्र, अक्षय नारळे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांची उपस्थिती होती. त्र्यंबकच्या विकासाची कामे जुन्या काळातल्या लोकांनी केली आणि काही लोक श्रेय घेत असल्याबद्दल गंगापुत्र यांनी नाराजी व्यक्त केली.




