सिन्नर | Sinnar
मिरगावसाठी (Mirgaon) मंजूर झालेला जलकुंभ राजकीय दबावाचा वापर करून खरातच्या ईशान्येश्वर मंदिराच्या (Ishanyeshwar Temple) परिसरात उभा करण्यात आला. राज्य शासनाच्या पर्यटन व गौण खनिज विभागाचा निधीही बेकायदेशीरपणे या मंदिराकडे वळवण्यात आल्याचा आरोप नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नगरसेवक पंकज जाधव यांनी केला. नगरपरिषदेत मंगळवारी (दि.३१) आयोजित पत्रकार परिषदेत (Press Conference) ते बोलत होते.
शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या सन २०२०-२१ च्या निधीतून जलकुंभासाठी ८ लाख ६९ हजार ३४१ रुपयांचा निधी मंजूर झाला होता. जलकुंभाचे काम एक तर शासनाच्या जागेवर करावे लागते. खासगी जागेवर हा जलकुंभ उभा करायचा असेल तर त्या जागेच्या मालकाकडून त्याचे दानपत्र करून घ्यावे लागते. मात्र, अशी कुठलीही कार्यवाही करून न घेता या जलकुंभाचे काम पूर्ण करण्यात आले. गावात या काळात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून सर्च शासकीय नियम धाब्यावर बसवून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या कामासाठी निधी मंजूर केला.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : भोंदू अशोक खरातला ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार
भाजपचे नेते उदय सांगळे यांच्या पत्नी शीतल सांगळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असतानाच या जलकुंभाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला व त्यांच्या कार्यकाळानंतर तो मंजूर करण्यात आल्याचा आरोप उगले, जाधव यांनी यावेळी केला. गावाला वेठीस धरून हा निर्णय घेण्यात आला. त्यात कुणाला स्वारस्य होते, असा प्रश्न त्यांनी केला, त्यावेळी जयंत पाटील राज्याचे जलसंपदा मंत्री होते तर पालकमंत्री दादा भुसे होते. त्यावेळी भुसे यांचा सर्व कारभार कोण पाहत होते, असा प्रश्न विचारत सांगळे यांच्याकडे त्यांनी संशयाची सुई फिरवली. राज्याच्या खनिज विकासनिधी अंतर्गत जुलै २०२३ मध्ये सिन्नर-शिर्डी रस्त्यापासून न्यासाच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी एक कोटीचा निधी (Funds) मंजूर करण्यात आला.
हे देखील वाचा : Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना खरात प्रकरणात अद्याप SIT ची नोटीसच नाही! चौकशीच्या केवळ चर्चाच
मुळात खनिज विकास निधीचा वापर फक्त दगडाच्या खाणी अथवा खडीक्रशरमुळे बाधित होणाऱ्या भागाच्या विकासासाठी खर्च करण्यात येतो. मात्र, मिरगाव भागात कुठेही दगडाची खाण अथवा खडीक्रशर नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुढाकाराने हा निधी मंदिराकडे जाणान्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी वापरण्यात आला. शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत ऑक्टोबर २०१८ मध्ये ईशान्येश्वर मंदिर देवस्थानाच्या परिसरात ७२ लाख ४० हजार ४७६ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. हे उदय सांगळे यांच्या पाठबळानेच हे शक्य झाल्याचा आरोप उगले, जाधव यांनी केला. शहरात गोंदेश्वरसारखे ऐतिहासिक मंदिर असताना तिकडे कोणी येत नाही. मात्र, खरातकडेसर्व मंत्री येतात. शासनाचे कोट्यवधी रुपये येतात. त्याचे कर्ते-धर्ते सांगळे हेच असून त्यांना खरात सोबतच सहआरोपी करावे अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेस दत्ता हाडे, सुनील गवळी, अजय गोजो, येोगानंद गवळी, प्रवीण जाधव उपस्थित होते.
हे देखील वाचा : Ashok Kharat Wife Kalpana Kharat : वयात मोठं अंतर, लग्नानंतर सुनीताची झाली ‘कल्पना; भोंदू अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू ऐकून व्हाल चकित
मोठे इव्हेंट घेऊन कायमच दिशाभूल
भोंदू खरातमुळे सिन्नर तालुक्याची बदनामी होत असतानाही त्यावर कोणी बोलायला तयार नाही. खरातचा दबदबा वाढवण्यासाठी मदत करणारे नामानिराळे राहिले आहेत. गेल्या १०-१२ वर्षात खरात्तला बळ देण्याचे काम ठराविक गटाने केले असल्याचा आरोप उगले, जाधव यांनी केला. तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी कायमच अशा भोंदू बाबांना विरोध केला आहे. केवळ कोकाटे यांना अडचणीत आणण्यासाठी खरातला हाताशी धरून कर्मकांड करण्यात आले. सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सांगळे यांनी ईशान्येश्वर मंदिरात दोन-तीन दिवस पूजाविधी केल्याचा ही आरोप त्यांनी केला. शहरासह तालुक्यात मोठ-मोठे इव्हेंट घेऊन दिशाभूल करण्याचे काम सांगळे नेहमीच करत आले आहेत. आताही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा मोठा इव्हेंट ते करत आहेत. या स्पर्धेसाठी राज्य शासनाचाच निधी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. मात्र, क्रीडा खात्याच्या मंत्री सुनेत्रा पवार, उपमुखामंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकाही मंत्र्याचा या स्पर्धेच्या पोस्टरवर अथवा होर्डिंगवर फोटो नसल्याचा आरोप त्यांनी केला.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : महिला गर्भवती राहू नयेत म्हणून खरात द्यायचा…; SIT च्या तपासात धक्कादायक माहिती समोर




