Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : भाजपशी हातमिळवणी करून भुजबळ देणार कांदेंना टक्कर; मंत्री महाजनांची...

Nashik Politics : भाजपशी हातमिळवणी करून भुजबळ देणार कांदेंना टक्कर; मंत्री महाजनांची घेतली भेट, बंद दाराआड खलबतं!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्यामध्ये युती होणार की नाही, याबाबतच्या चर्चेने जोर धरला आहे. दरम्यान आज (दि.१०) रोजी राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी भाजपचे नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नाशिक येथे भेट घेऊन युतीबाबत सविस्तर चर्चा केली.

- Advertisement -

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील संभाव्य युती, जागावाटप आणि इतर राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुकांचा (Election) कार्यक्रम जाहीर केला असून, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकाही लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींकडून स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घेण्याच्या सूचना मिळाल्या असल्याचे समीर भुजबळ यांनी सांगितले.

YouTube video player

यावेळी भुजबळ म्हणाले, येवला, लासलगाव, नांदगाव, मनमाड या भागात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. अनेक प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. उमेदवारी देताना इच्छुकांचा जनसंपर्क, जनहिताची तळमळ, जनतेच्या गरजांची जाण आणि निवडून येण्याची क्षमता यांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी म्हटले. तर मंत्री गिरीश महाजन यांनीही ही बैठक सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात गरज पडल्यास आणखी चर्चा होईल. लवकरच युतीबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्ह्यात (District) भाजप-राष्ट्रवादी युती होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये युतीच्या चर्चा सुरू असून, ही दुसरी महत्त्वाची बैठक मानली जात आहे. युती झाल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कांदेंना देणार टक्कर

२०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव आणि मनमाड मतदारसंघातून समीर भुजबळ यांनी बंडखोरी करून शिंदेसेनेचे सुहास कांदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीच्या काळात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. सुहास कांदेंनी तर थेट समीर भुजबळ यांना मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.त्यामुळे भुजबळ आणि कांदे वादाची चर्चा संपूर्ण राज्यात रंगली होती. या निवडणुकीत कांदे यांना १३८०६८ मतं मिळाली होती.तर अपक्ष उभे राहिलेल्या समीर भुजबळ यांना ४८१९४ मतं मिळाली होती. त्यामुळे या निवडणुकीत कांदेंनी समीर भुजबळांचा ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.
मनमाड आणि नांदगाव नगरपरिषदेवर आमदार सुहास कांदेंचे वर्चस्व आहे. तर येवला नगरपरिषदेवर भुजबळांचा प्रभाव आहे. त्यामुळे आता आमदार सुहास कांदेंना टक्कर देण्यासाठी समीर भुजबळांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...