Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Politics : आमदार देवयानी फरांदेंच्या पुत्राची निवडणुकीतून माघार; कारणही आलं समोर

Nashik Politics : आमदार देवयानी फरांदेंच्या पुत्राची निवडणुकीतून माघार; कारणही आलं समोर

नाशिक | Nashik

भारतीय जनता पक्षाने (BJP) यंदाच्या निवडणुकीत आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या मुलांना प्रथमच उमेदवारी न देण्याचा घेतलेला निर्णय शिरसावंद्य असून, त्या निर्णयाचा सन्मान राखत प्रभाग क्रमांक ७ मधून संभाव्य उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांचे पुत्र अजिंक्य फरांदे यांनी केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election 2026 : उमेदवारी जाहीर होण्याआधीच शक्तीप्रदर्शन करत आमदार फरांदेंचे पुत्र, सीमा हिरेंची मुलगी, दिनकर पाटलांकडून अर्ज दाखल

YouTube video player

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात अजिंक्य फरांदे (Ajinkya Pharande) म्हणाले की, भारतीय जनता पार्टीत सर्वप्रथम राष्ट्र त्यानंतर पक्ष आणि नंतर मी अशी भूमिका असते. त्यामुळे पक्षाचा आदेश श्रेष्ठ मानून नम्रपणे संभाव्य उमेदवारी मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फरांदे कुटुंबिय गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून भारतीय जनता पक्षाच्या संघटन वाढीसाठी सातत्याने कार्यरत असून,पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची परंपरा आजही कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढे ते म्हणाले की, प्रचाराच्या प्रारंभिक टप्प्यात प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिक, कार्यकर्ते, ज्येष्ठ व युवा मतदारांकडून मिळालेला विश्वास, प्रेम आणि प्रोत्साहन हीच आपली खरी सार्वजनिक संपत्ती आहे.यावेळी नगरसेवक होण्याची संधी मिळाली नसली, तरी प्रभागातील विकासकामे, मूलभूत समस्या आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पूर्वीप्रमाणेच निष्ठेने आणि जबाबदारीने कार्य करत राहू असेही अजिंक्य फरांदे यांनी म्हटले. तसेच प्रभाग क्रमांक ७ हा आपल्या कुटुंबासारखा असून, येथील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाची जाणीव मनात ठेवून पुढील वाटचाल सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...