Thursday, January 29, 2026
HomeराजकीयNashik Politics: "...म्हणून ते भाजपमध्ये येत असतील"; बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर आमदार...

Nashik Politics: “…म्हणून ते भाजपमध्ये येत असतील”; बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर आमदार हिरे स्पष्टच बोलल्या

विरोध कायम असल्याचेही सांगितलं

नाशिक | Nashik

ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून (Shivsena UBT Party) हकालपट्टी करण्यात आली आहे. बडगुजर यांनी पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही कारवाई केल्याचे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी सांगितले. त्यानंतर आता बडगुजर हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, त्यांना भाजपमधून जोरदार विरोध होत असून, याबाबत आमदार सीमा हिरे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना आमदार हिरे म्हणाल्या की, “सुधाकर बडगुजर भाजपमध्ये (BJP) येण्यासाठी इच्छुक आहेत असे माध्यमांमधून कळले. मात्र,आमच्यामध्ये असा कोणताही विषय किंवा चर्चा झालेली नाही. बडगुजर यांच्याविरोधात मी दोन वेळा विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढवली आहे. त्यांनी विखारी प्रचार करत, कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे परदेशात कॅसिनो खेळल्याचे कथित फोटो बडगुजर यांनीच मीडियाला दिले.तसेच नारायण राणे यांना जेवण करताना अटक करण्यात आली होती, त्याचे तक्रारदार बडगुजर होते. त्यामुळे व्यक्तीला पक्षात घेऊ नये अशी मागणी आम्ही वरिष्ठांकडे केली आहे” असे त्यांनी म्हटले.

YouTube video player

पुढे बोलतांना हिरे म्हणाल्या की, “बडगुजर यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांच्या मुलाने एकावर गोळीबार केला. तसेच स्वत सुधाकर बडगुजर यांच्यावर १७ गुन्हे दाखल आहेत. या सर्वामध्ये त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून ते गुन्हे (Case) लपवण्यासाठी भाजपामध्ये येत असतील. पक्षात आलो म्हणजे पवित्र होऊ असे त्यांना वाटत असेल. मात्र, आमचा त्यांना विरोध कायम आहे”, असेही त्यांनी सांगितले.

तसेच “महापालिकेत (NMC) आर्थिक व्यवहार होत नाही तोपर्यंत बडगुजर टेंडर देत नाहीत. ते ज्या पक्षात होते त्यांच्यामुळे अनेकांनी पक्ष सोडला. त्यामुळे आमची खात्री आहे की सर्व वरिष्ठ त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यापूर्वी विचार करतील. त्यांना पक्षात घेतलं तर आमचा पक्ष बॅकफुटवर जाईल. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही”, असेही आमदार सीमा हिरे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

default-featured-image

Ajit Pawar Death : थोड्याच वेळात अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
बारामती | Baramati राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी काल (बुधवारी) बारामतीमध्ये एका भीषण विमान...