Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Politics : जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी मतदान सुरु; तीन लाखांहून अधिक मतदार...

Nashik Politics : जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी मतदान सुरु; तीन लाखांहून अधिक मतदार ठरवणार ११ प्रथम नागरिक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Nagarparishad and Nagarpanchayat Election) आज (दि.२) रोजी मतदान (Voting) प्रक्रिया पार पडत असून, २६६ नगरसेवकपदांसाठी १,०२८ तसेच ११ नगराध्यक्षपदांसाठी ६१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांमधील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडीसाठी ४१६ मतदान केंद्रांवर आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान घेण्यात येत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, अधिकारी व कर्मचारी सोमवारी सायंकाळीच मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ७२ हजार ५४३ मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळाली आहे.

YouTube video player

या निवडणुका (Election) इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, भगूर, ओ झर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, सटाणा, मनमाड, नांदगाव न येवला या ११ नगरपरिषदांसाठी होत आहेत. जिल्ह्मात एकही मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आलेले नसले, तरी मतदान व मतमोजणीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, सिन्नर, ओझर व चांदवड नगरपरिषदांतील एकूण सात प्रभागांमधील निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने रविवारी स्थगिती दिली आहे. त्यामुळे वा सात प्रभागांसाठी आता २० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या नगरपरिषदांतील उर्वरित प्रभागांमध्ये मात्र आज मतदान होईल. या तीन नगरपरिषदांतील स्थगित प्रभाग वगळता, उर्वरित सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींची मतमोजणी (Counting) उद्या (दि. ३) करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील मतदारसंख्या

पुरुष मतदार – १,८७,९०६
महिला मतदार – १,८४,६१९
तृतीयपंथीय मतदार – १८

राज्यातील मतसंग्राम

थेट नगराध्यक्षपदाच्या – २६४ जागा
नगरसेवकपदाच्या – ६ हजार ४२ जागा
एकूण मतदार – १ कोटीहून अधिक
एकूण मतदान केंद्र – सुमारे १२ हजार ३१६
मतदानाची वेळ – सकाळी ७ ३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
मतमोजणी – उद्या सकाळी १० वाजेपासून सुरु

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...