Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल; बडगुजरांना उपनेतेपदी बढती, डी....

Nashik Politics : ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल; बडगुजरांना उपनेतेपदी बढती, डी. जी. सूर्यवंशींची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला (Thackeray’s Shiv Sena) एकही जागा जिंकता आली नव्हती. तर निवडणुकीआधी अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना पक्षाच्या उपनेतेपदी बढती देण्यात आली आहे. तर माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी (D. G. Suryawanshi) यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून देण्यात आली आहे.

दरम्यान, नुकतेच मागील आठवड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) डॅमेज कंट्रोलसाठी नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आले होते. यावेळी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात येतील, असे सांगितले होते. त्यानंतर चार दिवसातच ठाकरेंच्या शिवसेनेत फेरबदल करण्यात आले आहेत.

सुधाकर बडगुजरांची राजकीय वाटचाल

सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द २००७ पासून सुरू झाली आहे. नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून २००७ साली ते निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते.यानंतर त्यांनी १४ जून २००८ रोजी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आपल्या अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने २००९ ते २०१२ अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद दिले.तर २०१२ ते २०१५ या कालावधीत बडगुजर यांनी महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविले. तसेच २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये बडगुजर यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, या तिन्ही निवडणुकांत त्यांचा पराभव झाला. यानंतर आता सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...