Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik Politics : ठाकरेंच्या शिवसेनेला दुसरा मोठा धक्का; भुजबळांविरोधात निवडणूक लढलेला नेता...

Nashik Politics : ठाकरेंच्या शिवसेनेला दुसरा मोठा धक्का; भुजबळांविरोधात निवडणूक लढलेला नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

येवला | प्रतिनिधी | Yeola

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) ठाकरेंच्या शिवसेनेला पक्षाचे (Shivsena UBT) उपनेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांनी ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वेळातच त्यांचा मुंबईतील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर आता लगेचच ठाकरेंच्या शिवसेनेला दुसरा मोठा धक्का येवल्यातून बसला आहे.

- Advertisement -

येवल्याचे माजी आमदार मारोतीराव पवार यांचे पुतणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते संभाजी पवार (Sambhaji Pawar) हे आज आपल्या कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (Ajit Pawar NCP) प्रवेश करणार आहेत. संभाजी पवार यांनी दोन वेळेस मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात येवला मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

YouTube video player

दरम्यान, गेल्या काही दिवसात भुजबळ आणि पवार यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. यानंतर आज संभाजी पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे येवला शहरासह तालुक्यातील राजकारणाचे गणिते बदलणार असून, भुजबळांचे बळ अधिक वाढणार आहे. नुकतेच माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी सावरगाव येथे माजी आमदार मारोतराव पवार यांची भेट घेतली होती.

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...