Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : महापालिका निवडणुकीत बिग फाईट; 'या' प्रभागांमध्ये वातावरण टाईट

Nashik Politics : महापालिका निवडणुकीत बिग फाईट; ‘या’ प्रभागांमध्ये वातावरण टाईट

१२२ जागांसाठी तिरंगी-बहुरंगी लढती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik Mahapalika) एकूण १२२ जागांसाठी निवडणूक होणार असून, ७३५ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे (Election) चित्र स्पष्ट झाले असून, एकूण ३१ प्रभागांपैकी बहुतांश प्रभागांमध्ये तिरंगी व बहुरंगी लढती रंगणार आहेत.निवडणूक रिंगणात माजी महापौर, उपमहापौरांसह सहा ते सात वेळा महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केलेले अनुभवी नगरसेवक पुन्हा नशीब अजमावण्यासाठी उतरले आहेत.

- Advertisement -

या निवडणुकीत विशेषतः भाजपमध्ये बंडखोरीचे प्रमाण वाढलेले आहे. उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी बंडखोरी करत पक्षांतराचा मार्ग स्वीकारला खरा. मात्र, यातील मोजक्यांनाच इतर पक्षांनी (Other Party) आपल्यामध्ये सामावून घेतले. मात्र, ज्यांची दुसऱ्या पक्षात प्रवेशाची द्वारे बंद झाली ते काही ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या घडामोडींमुळे १२२ पैकी तब्बल ३० ते ३५ ठिकाणी निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Politics : महापालिका निवडणुकीत लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील दोन डझन नवखे उमेदवार रिंगणात

भाजप विरुद्ध शिंदे गटाची शिवसेना (BJP vs Shinde Shivsena) उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी (दोन्ही गट), काँग्रेस, मनसे तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये थेट सामना होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. काही प्रभागांमध्ये एकाच कुटुंबातील उमेदवार आमनेसामने उभे ठाकल्याने ही निवडणूक अधिकच चर्चेत आली आहे.

बंडखोरीचा फटका कोणाला?

भाजपमधील अंतर्गत नाराजी व बंडखोरीचा फटका कोणाला बसतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार थेट अधिकृत उमेद‌वारांसमोर उभे राहिल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. एकूणच नाशिक महापालिका निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची, रंगतदार आणि अनिश्चित निकालांची ठरणार असून शहह्यातील सत्तासमीकरणे बदलणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा : Nashik Politics : ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये ‘या’ तारखेला संयुक्त सभा; २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर

टॉप लक्षवेधी लढती

१- ब रंजना भानसी (भाजप) गणेश चव्हाण (शिवसेना), १-ड अरुण पवार (भाजप) प्रवीण जाधव (शिवसेना), २-क मच्छिंद्र सानप (भाजप) रुची कुंभारकर (अपक्ष), ५-ड गुरमित बग्गा (भाजप) -अशोक मुर्तडक (शिवसेना पुरस्कृत), ५-अ खंडू बोडके (भाजप) कमलेश बोडके (शिंदेसेना) ७-ड योगेश हिरे (भाजप) अजय बोरस्ते (शिंदेसेना), ९-ड अमोल पाटील (भाजप) प्रेम पाटील (शिवसेना), १०-अ विश्वास नागरे (भाजप) शशी जाधव (अपक्ष), १०ड माधुरी बोलकर (भाजप) पल्लवी पाटील (शिवसेना), ११-ड बाळा निगळ (भाजप) सलीम शेख (मनसे) लोंढे (रिपाई), ११-क सीमा निगळ (शिंदेसेना) – वसुधा कराड (भाकप), १२-ड शिवाजी गांगुर्डे (भाजप) समीर कांबळे (शिवसेना), १२-क नुपूर सावजी (भाजप) हेमलता पाटील (राष्ट्रवादी अप), १३-ड शाहू खैरे (भाजप) गणेश मोरे (शिवसेना), १३-अ आदिती पांडे (भाजप) वत्सला खैरे (काँग्रेस) रश्मी भोसले (शिंदेसेना), १३-क बबलू शेलार (भाजप) संजय चव्हाण (उबाठा), १४- ड सुफी जीन (काँग्रेस) शेख मुजाहीद (राष्ट्रवादी शप), १५-अ मिलिंद भालेराव (भाजप) प्रथमेश गिते (उबाठा), १५-क सचिन मराठे (भाजप) -गुलजार कोकणी (उबाठा), १६-अ प्रा. कुणाल वाघ (भाजप) राहुल दिवे (शिवसेना), १७-ड दिनकर आढाव (भाजप) – राजेश आढाव (शिवसेना), १७-अ प्रशांत दिवे (भाजप) मंगेश मोरे (उद्धवसेना), १८-ड विशाल संगमनेरे (भाजप) सुनील बोराडे (शिंदेसेना), २०-ड संभाजी मोरुस्कर (भाजप) – कैलास मुदलियार (शिवसेना) हेमंत गायकवाड (उबाठा), २२-ड केशव पोरजे (उद्धवसेना) विक्रम कोठुळे (राष्ट्रवादी अप), २४-ब कैलास चुंभळे (भाजप) प्रवीण तिदमे (शिवसेना), २७-क कावेरी घुगे (भाजप) – किरण दराडे (शिंदेसेना), २९-अ दीपक बडगुजर (भाजप) मुकेश शहाणे (अपक्ष), ३०-ड अजिंक्य साने (भाजप) सतिश सोनवणे (राष्ट्रवादी अ.प.), ३०-क डॉ. पुष्पा नवले संगीता जाधव, ३१-ड सुदाम डेमसे (शिंदेसेना) – सुदाम कोंबडे (मनसे)

हे देखील वाचा : Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; कुणाच्या तोफा धडाडणार?

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रातून आता पावसाचे अपडेट

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे लहरी, खराब हवामानामुळे शेतकर्‍यांना अनेकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रोजेक्ट प्रकल्प...