Friday, January 23, 2026
Homeमुख्य बातम्याNashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; 'या' बड्या नेत्याने दिला पदाचा...

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; ‘या’ बड्या नेत्याने दिला पदाचा राजीनामा

नाशिक | Nashik

महापालिकेच्या १२२ जागांसाठी आज (दि.१५) रोजी सकाळी साडे सात वाजेपासून शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदान सुरु होते. सकाळी साडे सात ते साडे नऊ वाजेपर्यंत ६.५१ टक्के मतदान (Voting) झाले होते. यानंतर साडे अकरा वाजेपर्यंत शहरात १४.३१ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी दीडपर्यंत साधारणता ३० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ३९.६४ टक्के इतके मतदान झाले होते. सायंकाळी साडे पाच वाजेनंतरही मतदारांच्या मतदान केंद्रांवर रांगा असल्याने मतदानाची आकडेवारी ५० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा :  Nashik Politics : भाजप उमेदवार बडगुजरांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिस छावणीचे स्वरूप

YouTube video player

उद्या (दि.१६) रोजी महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी नाशकात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार (Gajanan Shelar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शेलार यांचे पुतणे बबलू शेलार भाजपकडून नगरसेवकपदासाठी रिंगणात होते. त्यामुळे गजानन शेलार यांना माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर आता गजानन शेलार यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, ते कुठल्या पक्षात प्रवेश करतात हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

हे देखील वाचा : Nashik MC Election : निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; अनेक कुटुंबांतील मतदान वेगवेगळ्या ठिकाणी, मतदारांची धावपळ

दरम्यान, नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) एकूण १२२ जागांसाठी ७३५ उमेदवार (Candidate) रिंगणात असून, त्यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे व २०८ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती होणार आहेत. या निवडणुकीत एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ६ लाख ५६ हजार ६७५ महिला आणि ७ लाख ३ हजार ९६८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर तृतीयपंथी ७९ मतदार आहेत.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...