Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये 'या' तारखेला संयुक्त सभा; २० वर्षांनंतर...

Nashik Politics : ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये ‘या’ तारखेला संयुक्त सभा; २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर

आदित्य-अमित ठाकरे यांचाही रोड शो होणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महानगरपालिका निवडणुकीच्या (Mahanagarpalika Election) प्रचारासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे येत्या ९ जानेवारी रोजी नाशिकमध्ये संयुक्त जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेना उबाठा व मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित करण्यात आली असून, तब्बल २० वर्षांनंतर प्रथमच ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या सभेकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुकांसाठी उद्धव व राज ठाकरे याचे मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये (Nashik) एकत्र सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ३ ते १३ जानेवारी या कालावधीत राज्यात सभा होणार असून, त्यात नाशिकसाठी ९ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या सभेसाठी शिवसेना (उबाठा) पक्ष कार्यालयामार्फत महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाकडे पत्र देऊन मैदानाची अधिकृत मागणी नोंदवण्यात आली आहे.

YouTube video player

दरम्यान, त्यानुसार ९ जानेवारी रोजी नाशिकमध्ये ठाकरे बंधूची (Thackeray Borthers) पहिलीच संयुक्त जाहीर सभा होणार आहे. शिवसेना आणि मनसेच्या विभाजनानंतर दोन स्वतंत्र पक्षांचे सर्वोच्च नेते म्हणून ते प्रथमच नाशिकच्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये (Party Workers) उत्सुकता निर्माण झाली आहे.

आदित्य-अमित ठाकरे यांचाही रोड शो होणार

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हेही सक्रिय होणार असून, मुंबईप्रमाणेच नाशिकमध्येही दोघांचा संयुक्त रोड शो आयोजित करण्यात येणार आहे. दोन्ही युवा नेते एकत्र प्रचारात उतरणार असल्याने नाशिकच्या राजकीय वातावरणात चांगलेच तापणार आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे अनेक विद्यमान व माजी नगरसेवक पक्ष सोडून इतर पक्षांत गेले असल्याने पक्षाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी उद्धव व राज ठाकरे यांच्या एकत्रि‍करणानंतर नाशिकमध्ये ही जाहीर सभा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या ऐतिहासिक सभेमुळे नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला मोठी चालना मिळणार असून, शहराच्या राजकारणात नवे समीकरण आकाराला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रविवारी महायुतीच्या नेत्यांची बांधबंदिस्ती

नाशिक शहर परिसरात महायुतीच्या नेत्यांनी विविध बैठका घेऊन पक्षातील नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने नेत्यांसह कार्यकत्यांना संबोधित केले. त्यांच्यात उर्जा देण्याचा प्रयत्न केला. यात मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेगवेगळ्या बैठकांतून प्रबोधन केले.

ताज्या बातम्या

सुरेश

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन; वयाच्या ८२व्या वर्षी घेतला अखेरचा...

0
पुणे | Puneकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज (6 जानेवारी 2026) पुण्यातील वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने...