Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : नाशिक-पुणे रेल्वेला मिळणार गती

Nashik News : नाशिक-पुणे रेल्वेला मिळणार गती

निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्ती होणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात महायुतीला (Mahayuti) मिळालेल्या घवघवीत यशानंतर बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या (Nashik-Pune Semi High Speed ​​Rail Line) आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाची केंद्रस्तरावरून घोषणा होताना निधीचीही तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जय्यत तयारी

YouTube video player

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या पारड्यात कौल दिला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये नवे सरकार स्थापन होणार आहे. मात्र नव्या सरकारपुढे राज्यातील रखडलेले प्रकल्प, विकासकामे व पायाभूत सुविधांच्या उभारणीचे आव्हान राहणार आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार केल्यास झालेल्या प्रस्तावित मात्र रखडलेल्या प्रकल्पांपैकी एक असलेला बहुउद्देशीय प्रकल्प म्हणजे नाशिक-पुणे रेल्वेमार्ग. त्यासाठीच्या आशा मात्र या निकालाने पल्लवित झाल्या आहेत.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीचा मंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरला! किती जण घेणार मंत्रीपदाची शपथ?

नाशिक-संगमनेर-पुणे (Nashik-Sangamaner-Pune) या तीन महत्वाच्या भागांच्या विकासात भर पाडणाऱ्या २३२ किलोमीटरचा सेमीहायस्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आहे. या रेल्वेमुळे तीन्ही भागामधील कृषी व औद्योगिक विकासालादेखील चालना मिळणार आहे. मात्र, चालू वर्षाच्या प्रारंभी प्रस्तावित नाशिक- सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-पुणे या मार्गात बदल करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला होता. तसेच नव्याने नाशिक-सिन्नर-शिर्डी- पुणे असा हा मार्ग नेण्याची तयारी शासनाने केली होती. मात्र, शासनाच्या या निर्णयावर तिन्ही जिल्ह्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत असल्याने पूर्वीचाच मार्ग प्रस्तावित ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : Shrikant Shinde : महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार का? अखेर श्रीकांत शिंदेंनी स्वत:च दिलं स्पष्टीकरण

दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Election) प्रचारादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यास नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला गती देण्याची घोषणा केली होती. तसेच पहिलाच नाशिक-संगमेनर-पुणे असा मार्ग ठेवण्याचे आश्वासनदेखील दिले होते. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सेमी हायस्पीड रेल्वेबाबत दिलेल्या आश्वासनाची तातडीने पुर्ती करतील अशी आशा पल्लवीत झाली आहे.

राजकीय विरोध दूर

बहुचर्चित नाशिक-पुणे रेल्वेमार्गामध्ये राजकीयदृष्ट्या संगमनेर अडचणीचे ठरत होते. प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे संगमनेरच्या सर्वांगीण विकासात झपाट्याने वाढ होणार होती. त्याचे श्रेय विरोधकांच्या पारड्यात जाण्याची भीती अधिक होती. त्यामुळे शासनाने प्रस्तावित मार्गात बदल करण्याचा घाट घातल्याची चर्चा होती. परंतु विधानसभा निवडणुकीत संगमेनरवासियांनीच बदल घडवला आहे. परिणामी केंद्र व राज्य सरकारकडून प्रकल्पाला तातडीने मंजुरी देतानाच निधीची भरघोस तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

दृष्टिक्षेपातून

नाशिक-संगमनेर-पुणे हा २३२ किलोमीटरचा दुहेरी रेल्वेमार्ग
प्रकल्पासाठी अंदाजे १६ हजार कोटींचा खर्च
कृषी, औद्योगिक विकासाला चालना
नाशिक-पुण्यातील प्रवासाची वेळ पावणेदोन तासांवर येणार
नाशिक व पुण्याच्या याउपर उद्योग क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...