Wednesday, January 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : महायुतीचा मंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरला! किती जण घेणार मंत्रीपदाची शपथ?

Maharashtra Politics : महायुतीचा मंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरला! किती जण घेणार मंत्रीपदाची शपथ?

मुंबई | Mumbai

राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी गुरुवार (दि.५ डिसेंबर २०२४) रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानावर होणार असून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. महायुतीमध्ये (Mahayuti) भाजपला (BJP) सर्वाधिक १३२ जागा मिळाल्याने त्यांचा मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपकडून अजूनही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे मोठा सस्पेन्स पाहायला मिळत आहे. उद्या भाजपने विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी बैठक बोलावली असून उद्याच्या बैठकीतच राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण? याचं कोडं सुटणार आहे. तर महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार आहे. त्यामुळे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? आणि तिन्ही पक्षाचे किती मंत्री शपथ घेणार? याबाबतची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जय्यत तयारी

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला २३ ते २४ मंत्रीपद तर शिवसेनेला (Shivsena) उपमुख्यमंत्री पदासोबत १२ ते १३ मंत्रीपद मिळणार आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार (NCP Ajit Pawar) यांना उपमुख्यमंत्रिपदासोबत (DCM) ९ मंत्रीपद मिळणार आहेत. तसेच विधानसभेचे अध्यक्षपद भाजपाकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. तर विधानपरिषदेचे सभापतीपद शिवसेनेला देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत नागपुरात होणार असून त्याआधीच खातेवाटपासह इतर चर्चा पूर्ण होणार आहेत.

हे देखील वाचा : Shrikant Shinde : महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार का? अखेर श्रीकांत शिंदेंनी स्वत:च दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, गुरुवारी (दि.५ डिसेंबर) होणाऱ्या शपथविधीवेळी (Oath Ceremony) महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह तिन्ही पक्षाचे काही नेते देखील मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यात भाजपचे १० आणि शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ५ असे एकूण २० जण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मंत्रि‍पदी तिन्ही पक्षांतून नेमकी कुणाला संधी मिळते? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या