Thursday, September 19, 2024
HomeनाशिकNashik Rain Update : नाशकात पावसाची संततधार, तर त्र्यंबकला 'जोर'धार; नागरिकांचे हाल

Nashik Rain Update : नाशकात पावसाची संततधार, तर त्र्यंबकला ‘जोर’धार; नागरिकांचे हाल

नाशिक | Nashik

- Advertisement -

गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्याने नदी नाले दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. त्यानंतर आजही नाशिक शहरात (Nashik City) पावसाची संततधार कायम पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) जोरदार पावसासोबतच वारे वाहत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

हे देखील वाचा : काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याने धरणांच्या (Dam) पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह (Gangapur Dam) इतर धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांसह नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या गंगापूर धरण ८९.८४ इतके टक्के भरले असून या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदाकाठावरील छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच या सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पूर परिस्थिती कायम असून दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी पोहचले आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची ‘जोर’धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर

आज सकाळी गंगापूर धरणासह पालखेड, दारणा आणि नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यात गंगापूर धरणातून सकाळी ६ वाजता ८ हजार ४२८ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी ९ वाजता हा विसर्ग १२०४ क्यूसेकने कमी करून एकूण ७ हजार २२४ क्यूसेकने सोडण्यात आले असून पावसाचा जोर कायम असल्यास टप्याटप्याने एकूण विसर्ग वाढवण्यात येणार आहे. तर आज सकाळी ९ वाजता दारणा धरणातून २ हजार ०५८ क्यूसेकने विसर्ग कमी करून एकूण १० हजार १२० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

हे देखील वाचा : विशेष मुलाखत : दै. ‘देशदूत’चा ५५ वा वर्धापन दिन 2024

तसेच कडवा धरणातून (Kadwa Dam) सकाळी १० वाजता १ हजार ०२२ क्यूसेक विसर्गाने वाढ करून एकूण ४ हजार १३२ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्याचबरोबर नांदूरमध्यमेश्वर धरणातून (Nandur Madhyameshwar Dam) सकाळी ९ वाजता पाण्याचा विसर्ग ६२ हजार ३७१ क्यूसेक होता. त्यानंतर सकाळी १० वाजता त्यामध्ये ६ हजार ९९६ क्यूसेकने वाढ करुन एकूण ६९ हजार ३६७ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय पालखेड धरणातून (Palkhed Dam) सकाळी ६ वाजता ६ हजार २२० क्युसेकने विसर्ग कमी करून एकूण २० हजार ८९० क्यूसेकने कादवा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

हे देखील वाचा : केंद्र सरकारची मोठी घोषणा! लडाखमध्ये होणार पाच नवीन जिल्हे; केंद्रीय गृहमंत्री शाहांची माहिती

त्र्यंबकला पावसाची ‘जोर’धार

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वर शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे लोक अक्षरक्षा हैराण झाले आहेत. तर त्र्यंबक शहरात रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने शहराला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याशिवाय ग्रामीण भागात काल रात्रीपासून मुसळधार पावसासोबतच जोरदार वारे वाहत असल्याने अनेक घरांचे पत्रे आणि भिंती कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या