Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Rain News : नाशकात पावसाची संततधार; गंगापूर धरण इतके 'टक्के' भरले

Nashik Rain News : नाशकात पावसाची संततधार; गंगापूर धरण इतके ‘टक्के’ भरले

नाशिक | Nashik

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यामुळे धरणांच्या (Dam) पाणीपातळीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिक जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा (Gangapur Dam) पाणीसाठा ९३.०४ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. तर दुसरीकडे पाणीपातळी वाढत असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

आज सकाळी गंगापूर आणि दारणा धरणातून (Darna Dam) विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यात गंगापूर धरणातून सकाळी ८ वाजता ५२० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी १० वाजता १०५९ क्यूसेस तर दुपारी १ वाजता २३८२ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले होते. तसेच दुपारी ४ वाजता गंगापूर धरणातून ३९७० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले असून पावसाचा जोर कायम असल्यास टप्याटप्याने एकूण विसर्ग वाढवण्यात येणार आहे.

दरम्यान, काल दिवसभर आणि रात्री जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वरमध्ये (Igatpuri and Trimbakeshwar) जोरदार पाऊस (Rain) झाला होता. या पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. तर इगतपुरी शहरातील खालच्या पेठ येथील रहिवाशांच्या घरात थेट पावसाचे पाणी शिरल्याने येथील नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहावयास मिळाले. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले होते.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात शुक्रवारी रेकॉर्ड ब्रेक पाऊस

काल दिवसभर आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. काल (शुक्रवारी) दिवसभर त्र्यंबक तालुक्यातील तीन मंडळांत मिळून २०० मिमी पाऊस झाला आहे. यातील त्र्यंबकेश्वर १०६. मिमी, वेळुंजे ६०. मिमी आणि हरसूल ३४.०८ मिमी असा एकूण २००.०८ मिमी पाऊस झाला आहे. तर काल सायंकाळी ६ ते १० या चार तासांत रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे.

नाशिकसह ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

आज शनिवार (दि.२४) रोजी नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगांव, पुणे जिल्ह्यात तर रविवार (दि.२५) ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात दुपारनंतर गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच २६ ते ३० ऑगस्टपर्यंत ऊन पुन्हा तापणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या