Wednesday, December 4, 2024
HomeनाशिकNashik News : माणिकपुंज धरण शंभर टक्के भरले

Nashik News : माणिकपुंज धरण शंभर टक्के भरले

नांदगाव । वार्ताहर | Nandgaon

तालुक्यातील माणिकपुंज धरण (Manikpunj Dam) शंभर टक्के भरले असल्याची माहिती माणिकपुंज धरण प्रमुख एम.बी .शिदे यांनी दिली आहे. नांदगाव शहराची पाणी पुरवठा योजना व तालुक्यातील काही गावांचा पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.यामुळे नांदगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Dam Storage : जिल्ह्यातील धरणे भरली; कोणत्या धरणांत किती टक्के पाणीसाठा?

नांदगाव तालुक्यात (Nandgaon Taluka) पर्जन्यमान कमी असल्याने दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात.तर तालुक्यातील पूर्व भागातील जळगाव बुद्रुक, न्यायडोंगरी, पिंपरखेड, मुळडोंगरी, सावरगाव, कासारी, बाणगांव, कसाबखेडा, जळगांव खुर्द, हिंगणे देहरे आदी गावांसह चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांमध्ये सिंचनासाठी उपयुक्त ठरणार आहे.गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात वरुणराजा सलग बरसत असल्याने माणिकपुंज धरण शंभर टक्के भरले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

दरम्यान, नांदगाव तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची (Rain) हजेरी लागलेली नसल्याने तालुक्यातील नाग्यासाक्या, भालूर, दहेगाव ही धरणे कोरडीच आहेत. या पार्श्वभूमीवर माणिकपुंज धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजना जिवंत झाल्याने परिसरातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या