Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Rain : गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदाकाठी पूरसदृश परिस्थिती

Nashik Rain : गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदाकाठी पूरसदृश परिस्थिती

शहरात आठ मिलिमीटर पाऊस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यातही (Nashik District) जोरदार धडक दिल्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांतून (Dam) विसर्ग वाढविण्यात आला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने धरणातून ६,३५६ क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे.

- Advertisement -

गंगापूरमधून (Gangapur) विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी (दि.२२) गंगापूर धरणातून (Gangapur Dam) २७६ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. त्यात मंगळवारी (दि.२३) वाढ करत ६,३५६ क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे. दारणा धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आला असून, २,२०४ क्यूसेकने तो करण्यात येत आहे.

YouTube video player

मे महिन्याच्या मध्यापासून पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील धरणांसह नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात ९९ टक्के साठा आहे. त्यामुळे नाशिक जिल्हावासीयांचे पाणीकपातीचे संकट टळले असले, तरी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पिकांचे (Crop) मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.कांदा, द्राक्ष, तसेच फळबागांना पावसाचा फटका बसत आहे. त्याचप्रमाणे फुलशेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

दरम्यान, गंगापूरमधून विसर्ग वाढविण्यात आल्याने दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी लागले आहे. गोदाकाठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे विसर्ग वाढविण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याला यलो अलर्ट दिल्यानुसार जिल्ह्यात जोरदार पाऊस (Rain) होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

चार दिवसांत विक्रमी पावसाची नोंद

नाशिक शहरात गेल्या चार दिवसांत विक्रमी पावसाची नोंद झाली. सोमवारी (दि. २२) नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दीड तासात ३७ मिलिमीटर पाऊस झाला. मंगळवारी (दि.२३) दुसर्या माळेला दिवसभरात आठ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. दरम्यान, येत्या शुक्रवारी (दि.२६) जिल्ह्याला पुन्हा यलो अलर्ट देण्यात आला असल्याने परतीचा पाऊसही जिल्ह्याला झोडपून काढण्याची शक्यता आहे.

जायकवाडीला ७५ टीएमसी पाणी

नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जूनपासून ८ लाख ७० हजार २७९ क्यूसेक म्हणजेच ७५,२१९ दलघफू विसर्ग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाकडे झालेला आहे.

धरणांतून विसर्ग

दारणा २२०४, गंगापूर ६३५६, वालदेवी १०७, आळंदी २४३, भावली २९०, भाम ५१०, वाघाड ५४४, पालखेड ४३३, नांदूरमधमेश्वर ९४६५, करंजगाव १३५४, कडवा ८४०, तिसगाव १३३, गौतमी गोदावरी ७२०, कश्यपी ५६०, मुकणे ३६३, पुणेगाव १९५०, ओझरखेड २४.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...