Friday, July 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRain Update : नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी; आजचा राज्यातील हवामान...

Rain Update : नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी; आजचा राज्यातील हवामान विभागाचा अंदाज काय?

नाशिक | Nashik

शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात (Rural Area) काल (मंगळवारी) रात्रीपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना (Citizen) दिलासा मिळाला आहे. मान्सूनचे राज्यात आगमन होऊन देखील नाशिक जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. यामुळे शेतकर्‍यांसह नागरिकांच्या नजरा पावसाकडे लागून होत्या. त्यानंतर काल रात्रीपासून नाशिक शहरासह विविध तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याचे बघायला मिळत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सिन्नर निफाड या भागात पाऊस सुरु आहे. तर नाशिक शहरातील (Nashik City) सातपूर, द्वारका, सीबीएस, मेनरोड, सिडको यासह वेगवेगळ्या भागात सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांची मोठी धांदल उडाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी शहरातील सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने (IMD) २८ जून ते ४ जुलै या कालावधीत कोकण आणि गोव्यात बऱ्यापैकी सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून, काही भागांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम भारतातील इतर भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील हवामान विभागाचा अंदाज काय?

कोकण विभागात पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट वर्तविण्यात आला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण विभागात पाऊस हाहाकार माजवण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

याशिवाय विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मान्सून दाखल होण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांत यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...