Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedदेशदूत संवाद कट्टा : नाशिकमधील होळी, रंगपंचमी उत्सव

देशदूत संवाद कट्टा : नाशिकमधील होळी, रंगपंचमी उत्सव

नाशिक | प्रतिनिधी

फाल्गुन कृष्ण पौर्णिमेपासुन सुरू झालेला होळीचा उत्सव फाल्गुन कृष्ण पंचमीला म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी संपुष्टात येतो. या दिवसांत नाशकात पारंपरिक सोहळा पाहायला मिळतो. विशेष म्हणजे या सोहळ्याची परंपरा ही पेशवेकालीन आहे. नाशिक मध्ये रंगपंचमी रहाडीवर खेळली जाते.

- Advertisement -

वास्तविक यंदा जगभरावर कोरोना व्हायरसचे सावट आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढते आहे. त्यामुळे यंदाचा हा सोहळा होणार नाही. घरगुती पद्धतीने हा संपूर्ण सण साजरी होणार आहे.

या रंगपंचमीच्या आठवणी, परंपरा, धुलीवंदन, वीरांची परंपरा, या सर्व गोष्टींची नाशिककरांना आठवण राहावी यासाठी दैनिक देशदूतकडून आज विशेष संवाद कट्अट्सयाचे आयोजन करण्तायात आले होते. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा कट्टा ऑनलाईन पद्धतीने झाला.

यामध्ये अनिता जोशी, राजेश नाशिककर व मोहन उपासनी यांचा सहभाग होता. कट्ट्यासाठी संवाद देशदूत आणि देशदूत टाईम्सच्या संपादक डॉ वैशाली बालाजीवाले यांनी साधला.

- Advertisment -

ताज्या बातम्या