Friday, October 18, 2024
Homeक्राईमNashik News : हुल्लडबाजांवर कारवाई; चार ठिकाणी नाकाबंदी

Nashik News : हुल्लडबाजांवर कारवाई; चार ठिकाणी नाकाबंदी

९ मद्यपि चालक सापडले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विकेंडला धमाल करण्यासाठी त्र्यंबकेश्वर, पहिने येथे येणाऱ्या पर्यटकांना (Tourist) रविवारी (दि.२१) पोलिसांच्या (Police) नाकाबंदीचा (Blockade) सामना करावा लागला. त्यानंतर ग्रामीण पाेलिसांनी (Rural Police) चार ठिकाणी नाकाबंदी करीत मद्यपी चालक, हुल्लडबाज, ट्रिपल सीट चालकांवर कारवाई केली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : पहिने धबधब्यावर तरुणांमध्ये ‘दे दणादण’; Video व्हायरल

जिल्ह्यात अद्याप पावसाने (Rain) अपेक्षित हजेरी लावलेली नाही. तरीही बहुतांश पर्यटन स्थळे बहरत असून पर्यटकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील पर्यटक इगतपुरी, वाडिवऱ्हे, त्र्यंबकेश्वर, गंगापूर व बॅकवाॅटर येथे येऊन निसर्गाचा आनंद लुटतात. मात्र त्यासोबत काही हुल्लडबाज, मद्यपी या ठिकाणी येत असल्याने पर्यटन सहलींना काही वेळेस गालबोट लागते.

हे देखील वाचा : Nashik News : पावसात फिरायला गेले आणि अडकले; अंजनेरी गडावरचा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video आला समोर

गत आठवड्यात पहिने येथे दोन गटात वाद झाल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. त्यामुळे सहकुटूंब आलेल्या पर्यटकांमध्ये घबराट उडाली होती. या घटना पुन्हा घडू नये यासाठी ग्रामीण पोलिसांनी यावेळी खबरदारी घेतली. त्यानंतर पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या सुचनांनुसार ग्रामीण पोलिसांनी पर्यटन स्थळांवर नाकाबंदी करीत वाहन तपासणी केली. शनिवार व रविवारी (दि.२० व २१) पहिने येथे बंदोबस्तासह चार ठिकाणी पाॅईंट लावुन नाकाबंदी करण्यात आली.

हे देखील वाचा : संपादकीय : २२ जुलै २०२४ – योजना स्वागतार्ह; पण..

दरम्यान, बंदोबस्तासाठी पोलीस मुख्यालयातील (Police Headquarter) १ अधिकारी ६ अंमलदार,  वाडीवऱ्हे पोलिस  ठाण्याचे २ अधिकारी १० अंमलदार तैनात होते. वाहनांची तपासणी करीत मद्यसाठा नेणाऱ्यांवर कारवाई केली. तपासणी होत असल्याने अनेकांनी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा बेत आखला.

७८ चालकांवर दंडात्मक कारवाई

मद्य नेणाऱ्यांवरही पोलिसांनी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. तर, बंदोबस्तादरम्यान, मद्यसेवन करून वाहन चालवणाऱ्या ९ चालकांवर पाेलिसांनी कारवाई केली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७८ चालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यात ७२ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या