नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ग्रामीण भागात (Rural Area) गावठी, देशी मद्य वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कठाेर कारवाई करुन मुद्देमाल हस्तगत केला आहे. अचानक राबविलेल्या धाडसत्रांत पोलिसांनी (Police) ६० संशयितांविरोधात ५९ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच ३ लाख १३ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हे देखील वाचा : प्लास्टिक बंदीबाबत मनपा व्यापक मोहीम राबविणार
पाेलीस अधिक्षक विक्रम देशमाने (Vikram Deshmane) यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगावचे अपर पेालिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या सुचनेनुसार पथकांनी पोलिस ठाणेनिहाय गुरुवारी (दि.२७) दिवसभर कारवाई केली. त्यात गावठी हातभट्टीची दारु बनवणारे ठिकाणे रडारवर होती. त्यासाठी डोंगर, दऱ्या, नदी नाले असलेल्या ठिकाणी पोलिसांनी पायी गस्त घालून अवैध धंदे शोधले.
हे देखील वाचा : संपादकीय : २९ जून २०२४ – धीर सोडू नका
तसेच मद्य वाहतूक व विक्री करणाऱ्यांचीही शहानिशा करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. त्यात अवैध मद्यसाठा, कच्चा मालही पोलिसांनी जप्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व अवैध (Illegal) व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलीसांना कळवावी असे आवाहन अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केलेले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा