Friday, May 3, 2024
Homeनाशिकशाळा सुरु करण्यावर पुढील आठवड्यात शिक्कामोर्तब

शाळा सुरु करण्यावर पुढील आठवड्यात शिक्कामोर्तब

नाशिक | Nashik

राज्य शासनाच्या निर्देशांनंतर महापालिका हद्दीतील शाळा (NMC area school) सुरू करण्यासाठी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षांविषयक उपाययोजनांसंदर्भात महापालिका आयुक्त कैलास जाधव (NMC Commissioner Kailas jadhav) यांनी परिपत्रक जारी केले असून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०० टक्के लसीकरण (vaccination करण्याचे बंधन घालण्यात आले आहे….

- Advertisement -

या उपाययोजनांसह सज्ज राहण्याच्या सूचना सर्व शाळांना या परिपत्रकाद्वारे देण्यात आला आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय ९ डिसेंबरला घेतला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (NMC Education officer Sunita Dhangar) यांनी दिली.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर ग्रामीण भागात पाचवी ते बारावी व शहरी भागात आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र कोरोनामुळे गेल्या २० महिन्यांपासून नाशिक शहरातील पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू होऊ शकलेले नाहीत.

१ डिसेंबरपासून हे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने (State Government) घेतला; परंतू शाळा सुरू होण्यापूर्वीच कोरोना विषाणूच्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) या नव्या व्हेरियंटने जगभरात दहशत पसरविल्याने नाशिक महापालिका आयुक्तांनी (Nashik Municipal commissioner) सावधगिरीची भूमिका घेत १ डिसेंबरऐवजी दहा डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांनी देखील आपला निर्णय पुढे ढकलला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या